पान:मधुमक्षिका.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२० )


हिंदुस्थानाची सुधारणा.

ज्या मनुष्याला स्वदेशाभिमान नाहीं, तो जीवंत आणि मेला सारखाच समजावयाचा. हें बोलणें ह्या हिंदुस्थानांतील लोकांस लागू करण्यास आह्मांला कांहीं शंका वाटत नाहीं कांकीं, त्यांची सध्याची स्थिति- च तशी आहे. पृथ्वीच्या पाठीवर आजपावेतों पुष्कळ राष्ट्र परके लोकांच्या तावडीस सांपडून अगदीं दुर्दशेस मिळण्याच्या रंगास आलीं होतीं, तथापि, तेथच्या मूळच्या लोकांनी, आपले सर्व वेडेपण एकी- कडे ठेवून, विद्या व शौर्य ह्यांच्या बळानें, परके लोकां. स जेरीस आणून स्वदेश स्वतंत्र केला; अशीं अनेक उदाहरणें जगाच्या इतिहासांत आढळतात. तें साम- र्थ्य_आमच्या लोकांत आहे काय ? त्यांस दास्य इतकें गोड लागलें आहे कीं, त्याचें वर्णन देखील करवत नाहीं. पहा एकाद्यास आपणा पैकींच जरा उचलून बोलिला, ह्मणजे लगेच तो तांबडा लाल होऊन सर- कारांत फिर्याद जातो. परंतु, त्यालाच यःकश्चित् एकाद्या साहेबानें जरी लाथांखालीं तुडविलें, तरी तो त्याचे फारसे दुःख न मानितां कदाचित् उलटें कौतु कही करितो. आपणांमध्ये कितीही शाहणा विद्वान् पुरुष निपजूंद्या. त्याला, साहेबांच्या हाताखाली नौकरी पतकरून त्यांजपासून शाबासकी मिळविणें, हेंच काय तें भूषण वाटतें. शेतकी आणि व्यापार हीं तो अगदीं तुच्छ मानितो. आणखी दासपणाची आवड ती कशी असावयाची ? ह्या आवडीने आमचे देशाचा मोठा घात झाला आहे. तो हाचकों, स्वा