पान:मधुमक्षिका.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११९ )


होऊन, ७५ फटके व धिंड ह्या शिक्षा ठरल्या. त्या-प्रमाणे फटके मारून, त्यास एका रोडक्या उंटावर बस- वून भर बाजारांत त्याची धिंड काढली. तेव्हां त्याचा बाप पायीं अनवाणी त्याचे बाजूनें चालत होता; पुढें वाजे वाजत होतीं; आणि " व्यभिचाराचें हें फळ हे शब्द तो वजीर मोठ्याने बोलत चालला होता. (१८ जुलै, १८३३ ). - व्यापार मोठा चालतो. रेशमी माल मुलतान आणि रुशिया ह्या देशांत पाठविल्याने सुमारे २००००० तिल, तेथील व्यापाऱ्यांच्या घरांत जातात. हा- तरुमाल आणि कलघी नामक एक प्रकारचें का पड, ह्रीं रेशमाचीं तयार होऊन पुष्कळ खप- तात. - काबुलाहून बुखायास काश्मिरी शाली व इंग्रजी सामान येतें. त्याबद्दल साखर, कागद, आणि घोडे, ह्रीं तिकडे जातात. बुखाऱ्याचें लमाण ४ किंवा ५ हजार उंटांचें असतें. मुल्लारहीम शाह ह्मणून एक काबूलचा व्यापारी आहे, त्यानें काश्मि• राहून १७००० रुपयांच्या शाली रुशियांत मास्को येथे नेऊन ३४००० रुपयांस विकल्या. बुखायत पलंगपोस फारच उत्कृष्ट तयार होतात. - खुदिबेगी- खान हा ह्या शहरांत उत्तम कवि आहे. येयची मूळची भाषा लटली असतां तुर्की; परंतु सांप्रत लोक प्रायः फारसी बोलतात. • • ( जुलै, १८३३. )