पान:मधुमक्षिका.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )


मांत घाला; फार थोड्या वेळांत ते त्यामध्ये तर्बेज हो- तात; आणि तें उत्कृष्ट रीतीनें बजावितात; कारण, पुष्कळ ग्रंथावलोकनानें व विचाराने त्यांस प्रत्येक गोष्टीचीं का- रणें, उपयोग, ती सिद्धीस नेण्यासाठी तिचे भाग कसे कल्पावे, आरंभ कोठें करावा, साधनें कोणती योजावीं, व मधलीं विघ्नें कशीं निवारावीं, हें सर्व त्यांस स्पष्टपणें कळत असतें. तेणेंकरून कोणत्याही कामी त्यांची मति फार लवकर शिरते, व तें त्यांचे हातून उत्तम प्रकारें होतें. अर्थात्, इतर सर्व लोकांस ते उपयोगी व चांगले माटतात ; व त्यांस द्रव्यादि सुखप्रद पदार्थही यथेच्छ मिळतात. मनुष्याचें दुःख निवारणें, व त्याच्या सुखा- ची वृद्धि करणे, हा विद्याभ्यासाचा उत्कृष्ट परिणाम होय. हें न समजतां केवळ शिकण्यामध्ये अतिशयित काळ घालविणें हें चागले नव्हे. विद्या हें एक यंत्र आहे. ते केवळ जवळ असल्यानें मनुष्य मोठा होत नाहीं. तर, त्याचा उपयोग कसा करावा, हें समजून घेऊन, जो त्याप्रमाणे करितो, तोच थोर व सुखी असा निपजतो. विद्या हें एक अत्युत्तम भूषण आहे खरें; तथापि तेवढ्या- बरच फुशारून डौल मिरविणे, हें मूर्खपण आहे. पासून लाभ कांही एक न होतां, उलटा उपहास होतो. यास्तव सुज्ञ पुरुष त्या दुर्गुणाची छाया सुद्धां आपणांवर पडू देत नाहींत. इतर सारासार विचार न पाहतां, केवळ पुस्तकीय ज्ञानावरून कोणत्याही गोष्टीचा निर्णय करणे, हें बालिश कर्म होय.
 अनुभवानें विद्या परिपक्क होते. ह्मणजे असें कीं, जी गोष्ट, विद्याभ्यास करीत असता ग्रंथांवरून समजते,