पान:मधुमक्षिका.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११८ )



प्रवाह शहरामध्यें महिन्यांतून दाहा दिवस वाहतो. त्याचें पाणी टांक्यांत भरलेले असतें, तें लोक पितात. तें बीस दिवसांत इतकें नासतें कीं, त्यापासून माणसांस नारू होतात. - बुखारा हैं मुसलमानी धर्माचें पवित्र स्था- -न मानिलेले आहे. त्याच्या भिंती नीट नाहींत, इतकेच जरी कोणी माणूस बोलिला, तरी त्याला लोक नास्तिक ह्मणतात.–घोडे, खेचरें, गाढवें, उंटें, मेंढ्या, ह्रीं जनावरें पुष्कळ आढळतात. वाघ आणि लांडगे कोठें दृष्टीस पडत नाहींत - बुखाऱ्याचें दरसालचें उत्पन्न २०००० तिल, ह्मणजे सुमारें १३०००० रुपये आहे. मालावर जो कर घेतात त्याचें सर्व उत्पन्न लंगडे, आंधळे, पांगळे, अशा अनाथांस धर्मार्थ बांडितात. शहरांतील प्रत्येक हिंदूवर आठआठ आणे कर बसविला आहे. त्याचे उत्पन्नांत राजाचा अन्न- वस्त्राचा खर्च भागतो. ह्या राजाजवळ २०००० स्वार तयार असतात. त्यांपैकी कितीएकांस पगारा- बद्दल रोख पैसा मिळतो, व कितीएकांस धान्य मिळते. कवाईत त्यांस ठाऊक देखील नाहीं. येथे ६० तोफा आहेत. पण कोणाला करतां येत त्यांचा उपयोग नाहीं. बंदुकीची दारू फारच वाईट आहे. प्रसंग सैन्य जमवील, असें करण्यास पडल्यास हा राजा १००००० झणतात. परंतु त्यांचा पराभव शिकलेले १०००० लोक बस आहेत. - राजाचा वजीर कुशबेग हा मोठा न्यायी आणि श्रीमान् व्यापारी आहे. त्याचे मूलानें दारूच्या अमलांत एका स्त्रीवर जुलूम केला. त्याचा न्याय काजीपुढें