पान:मधुमक्षिका.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११७ )


चांगला देखणा आहे. तो धर्माचे कामांत फार सक्त नजर देवितो. त्यानें गादीवर बसल्यावर थोडक्याच दिवसांनीं कुशबेग ह्याज कडून आपले भावास मारविलें. त्यानें, आपणावर राजबंधुहत्येचा दोष लोकांनी घालू नये, व आपला द्वेष करूं नये, ह्मणून शर्याताचा पाठ करण्यास आरंभ केला, आणि महान् धार्मिकाचें स्वरूप धरिलें. हा राजा मोठा पराक्रमी आहे सबसैहर, समर्कद, आणि बल्क येथील सुभेदार त्यास खंडणी देतात. त्याला इराणाचें मात्र थोडेंसें भय आहे. तथापि तिकडच्या सैन्याच्या- नें त्याचें कांहीं होणें नाहीं; कांकीं, त्यास बुखान्यास येण्यास मार्ग परम दुर्गम आहे. देशांतील बंदोबस्त हा राजा चांगला राखितो. तो वस्त्रालंकारांनी नटत नाहीं. त्याच्या स्वारीबरोबर माणसें फार नसतात फावला वेळ ईश्वरभजन, विचार, आणि कुराणपठण ह्यांत हा राजा घालवितो. - तुर्कस्थानामध्यें बुखारा हैं शहर सर्वांत मोठें आहे. ह्यांत श्रीमान् लोक पुष्कळ राहतात. ह्यामध्यें मशीदी व पाठशाळा ३६० आहेत. त्यांत फारसी व आरबी भाषा शिकवितात. घरें प्रायः एकमजलीच आहेत. दुकानें सकाळीं प्रहर दिवसानंतर उघडतात, आणि तिस-या प्रहरीं बंद होतात..कांकीं, तेव्हां दुकानदार लोक रेजिस्तानच्या बाजाराला जातात. हा बाजार ह्याच्या मागच्या राजा- नैं वसविला. त्याची शोभा फार मनोरम आहे. रस्ते मध्यम प्रतीचे आहेत. शहरांत विहिरी आहेत, पण त्यांचें पाणी कोणी पीत नाहीं. समकैद नदीचा