पान:मधुमक्षिका.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११६ )



ळ राहतात.हल्लींचा राजा प्रजेच्या नीतीकडे लक्ष देतो. फार हिंदू आणि याहुदी ह्या लोकांस घोड्या- वर बसण्यास व आपले चालीचे पोषाक करण्यास परवानगी नाहीं. हिंदू आणि याहुदी ह्या लोकांस तेथचे लोक इतके नीच मानितात कीं, ते त्यांस कोणी फुकट देखील घेणार नाहीं. येथील लोकसंख्या सुमारें १७०००० आहे. बुखाऱ्याचा राजा स्वतंत्र आहे. तो स्वेच्छ कारभार करितो. तरी मुसलमानी शास्त्र शर्यात ह्यांतील नियम त्यास पाळावे लागतात. . चोरास कडेलोट करण्याची अथवा का. नाखाना नामक कोठडीत कोंडून ठेविण्याची शिक्षा होते. त्या कोठडींत विषारी किडे त्याला तोड तो- डून दोन दिवसांत ठार मारून टाकितात. दिवस मावळल्यावर रस्त्यावरची वाग बंद होते. शहरांव ३००० कोतवाल आहेत. ते रात्रभर 'हुशार' असें ओरडत फिरत असतात. लढाईच्या वेळीं प्रत्येक मनुष्यानें राजास पैसा दिला पाहिजे. राजा बोलेल तोच कायदा, असें लोक समजतात.-हवा चांगली आहे. “लोकांस नारूखेरीज दुसरा रोग बहुधा होत नाहीं. परंतु, त्या रोगापासूनच त्यांचे फार हाल होतात. हा रोग, मांजरें, कुतरे, पक्षी, ह्यांसही होतो. हिवाळ्यांत थंडीचा कडाखा पडतो. बर्फ देखील पडते. तें घरांवर तीन महिनेपर्यंत असतें. लोक . चाहा पितात. आणि बहुतकरून शेकोट्यांचे सभों-वती बसलेले असतात. - बुखाऱ्याचा हल्लींचा राजा नासरुल्ला खान आहे. तो पंचविसांच्या उमरीत असून