पान:मधुमक्षिका.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११५ )


मागें चार शिपायी हातांत चाबूक घेऊन उभे " असे मी पाहिले. त्यांची आह्मीं चौकशी केली, तेव्हां असें कळलें कीं, त्या दोघां मुसलमानांनीं प्रात:काळीं निमाज पढण्याची उपेक्षा केली, व ते सूर्योदय झाल्या- वरही निजून राहिले, ह्या अपराधांवरून काजीनें त्यांस ती शिक्षा दिली होती. हा प्रकार बुखाऱ्यास प्रायः दररोज घडतो. तमाखू ओढण्यावरून, दारू पिण्यावरून व तपकीर ओढण्यावरूनही काजी लोकांस शासनें करितो. उंटांवर बसलेले अपराधी उंच स्वरानें ओरडत असत कीं, "ऐका हो लोक, निमाज न पढेल, तमाखू ओढील, तपकीर ओढील, अथवा दारू पिईल, त्यास अशी नश्यत भोगावी लागेल." चमत्कार पाहा कीं, तमाखू पिण्यास मात्र प्रतिबंध; पण विकण्यास प्रतिबंध नाहीं. ! - शहराबाहेर मुसलमानांचा इदगा आहे. तो मीं जाऊन पाहिला. ती इमारत फार पसंत आहे. व तींत दोन पाण्याचे उत्कृष्ट झिरे आहेत. सायंकाळी येतांना मी याहुदी लोकांची आळी पाहिली. ते लोक, व विशेषेकरून त्यांच्या बायका फार सुंदर व नाजूक आहेत; इतक्या कीं, त्यांस पाहिल्याबरोबर मन भुलतें. हे लोक तेथें सुमारें ३००० आहेत. -- खाज्यांतील लोक बहुत करून दांडगे, धीट, आणि घोड्यावर बसणारे मोठे पटाईत असे आहेत. इतर लोकांचा दाहा दिवसांचा प्रवास हे दोन दिवसांत क- रितात. व. हे इतके नियही आहेत की, नेमल्या मुक्कामी पोहोंचत पर्यंत ते कोणत्याही कारणासाठीं आ- पल्या घोड्यांवरून उतरत नाहींत. ते लोक अमंग-