पान:मधुमक्षिका.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११४ )


उघड्या आंगणांत उभा राहिलों; तो धरणीकंप थांबला. चिमणदासाने मला सांगितलें कीं, सुमारें एक महिन्यापूर्वी वदकशान येथे धरणीकंप झाला. तेव्हां सुमारे १२००० मनुष्यें प्राणांस मुकली. जून.
 बल्क.-हें शहर पूर्वी फार मोठे होते. ते आतां मोडकळीस आले आहे. पेंठ बरीच आहे; पण चांग- ली बांधलेली नाहीं. मंगळवार खेरीज करून बाकी सर्व दिवस दुकानें बंद असतात. व्यापारी बहुधा मुसलमान आहेत. शहराबाहेर एक चिखली किल्ला आहे. त्याचें नांव चिहलगाजी, लोक ह्मणतात. कीं हा किल्ला रात्री फार उंच होत असतो. हैं शहर प्राचीन आहे. हें माझारगांव पावेतों पूर्वी दाट वस- लेलें होतें, असें सांगतात. - आक्षस नदी आह्मीं उतरलों. तिजमधील होड्या ओढण्यास घोडे लावितात. - तुर्कलो- क तंबूत राहातात, व गुरें पुष्कळ पाळितात. थंडीचे त्यांस कांहींच वाटत नाहीं. त्यांजपाशीं गुलाम पुष्क- ळ असतात. ते त्यांच्या बायकांशीं लागू होऊन त्यांच्या मेहेरवानीने सुटका पावतात.
 बुखारा. - ह्याच्या चारी बाजूंस वाळवंट आहे. सभों- तीं कोट आहे. शहरांत शिरतांच तद्देशी आचाऱ्यां- चीं दुकानें लागतात. बर्नसाहेब कुशबेग नामक प्रधानास भेटले. त्यानें त्यांस सांगितलें कीं, तुझीं येथें आहां तोंपर्यंत कांहीं एक लिहूं नये.कां कीं, तेणें-करून राजास तुमचा वहीम येईल.राजाचे हेर चोहींकडे फिरत असतात. - बाजारांतून जातांना दोन मुसलमान उंटांवर बसलेले, व त्यांच्या पाठी-