पान:मधुमक्षिका.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११३ )


प्रयत्न चालविले होते. त्यास त्याचा मित्र एके दिवशीं ह्मणं लागला कीं, प्रजेस लुटून गुलाम करणें हें मह परमेश्वरास आवडत नाहीं, ह्यास्तव आपण त्याचा त्याग करावा. अली बेगानें उत्तर दिले, "अरे, जर असें आहे, तर परमेश्वर माझ्या स्वमां- त येऊन तसे मला कां सांगत नाहीं ?" सुभेदार गरीब वासरांस लुटतो, आणि त्यांच्या द्रव्यानें मसीदी बांधितो . काय धर्मवासना ही. !!!
 लर्मस्त.—येथच्या स्त्रियांइतक्या सुंदर स्त्रिया, सग- ळ्या हिंदुस्थानांत माझे कोठें पाहाण्यांत आल्या नाहींत. थोडे वर्षांपूर्वी येथचा खान येथें नव्हता, तेव्हां जवळ- च्या प्रांताच्या एका सरदाराने ह्या प्रदेशावर चाल करून खानाची बायको धरून नेली. हें खानास समजल्यावर त्यानें लोक जमवून सात वर्षांनीं शत्रूचे हातून आपली बायको परत घेतली. तेव्हां ती व्यापा- सून गरोदर राहिली होती. तिला पुढे मुलगा झाला, त्याजवर खान फार प्रीति करितो. काय विल- क्षण चाल?
 खलम. - येथील तुर्कलोक गुलाम पुष्कळ बाळगितात. एयें चाहाचा व्यापार मोठा चालतो. रेशीम विपुल उत्पन्न होऊन काबूल आणि मुलतान येथें जातें. चिमणदास नामक गृहस्थाच्या घरीं मी सकाळच्या प्रहरी फराळ करीत असतां धरणी हालावयास लागून खोलीच्या दारांच्या झडपा फडफडफडफड वाजूं लाग ल्या. तेव्हां, आतां खोलीच कोसळून खाली पडते की काय, ह्या भयानें मी तटकर घराबाहेर पडून