पान:मधुमक्षिका.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११२ )


 "हे प्रिया, तुमचें नांव आणि रमणीय स्वरूप ह्रीं माझे त्हृदयांत अक्षय वतनदार होऊन बसली आहेत. त्यांच्या योगानें मला तुमचें विरहदुःख किती होत आहे, व तुह्मांविषयीं मी किती कामातुर झालें आहें, हैं माझ्यानें वर्णवत नाहीं. हल्लचानें किंवा छाप्यानें हा किल्ला तुमचे हातीं लागणें नाहीं. ज्या एका नळानें पाणी आंत येते, तो बंद करा, की हे आंतले लोक तान्हेनें तडफडून तुमच्या स्वाधीन झालेच. - हे प्राणवल्लभा, लोभ असों दे. "
 त्याप्रमाणें त्या तार्ताराने नळ बंद केला, आणि किल्ला घेतला. पुढे थोडयाच दिवसांनीं काफराच्या मुलीशीं त्यानें लग्न लाविलें. परंतु, तिजविषयीं त्याचे मनांत अविश्वास - उत्पन्न होऊन, एके दिवशीं त्यानें तिला जिवें मारिलें. तेव्हां तो ह्मणाला, "जी आपल्या प्रत्यक्ष बापाचा घात करण्यास चुकली नाहीं, ती नव- याचा करण्यास चुकेल काय. ? " गोष्ट खरी आहे. घातकी मनुष्याचा परिणाम कसा होतो, तो पाहा. - बामियन हा गांव दोस्त महंमदाचे ताब्यांत आहे. ह्यावर त्यानें हाजीखान काकर ह्मणून एक सुभेदार नेमिला आहे. तो ह्या प्रांताचें उत्पन्न जमा करितो. नुसत्या जकातीची ७०००० रुपयांची रक्कम त्यास मिळते. २३ मे १८३३.
 सैघान.–हें अफगाणिस्थानांतून निघून तुर्कस्थानां- त गेलें असतां प्रथमच लागतें, तेथें आह्मी गेलों. तेथचा सुभेदार अलीबेग ह्या नांवाचा होता. हझारा येथील लोक लुटून गुलाम करावे, ह्मणून त्याने अनेक