पान:मधुमक्षिका.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०९ )



मोहन लालाचे प्रवासवर्णन.
पेशावरापासून बुखाऱ्यापर्यंत.


 काबूल. - एका प्राचीन इराणी ग्रंथकाराने एके ठिकाणी असें लिहिलें आहे कीं, काबुलाचें मूळचें नांव ★ बक्त्यार असें होतें. त्यालाच युरोपियन लोक बाकू- त्रिया असें ह्मणत. पेशावरास पूर्वी बाग्राम असें नांव होतें; व त्याचे खालींच काबूल मोडत असे. दंत- कथेवरून कळतें कीं, हल्लीं ज्यास काबूल अशी संज्ञा प्राप्त झाली आहे, तो देश पूर्वी केवळ अरण्यमय होता.
 आणखी असें सांगतात कीं, इराणची परमरूप- वती राणी सिरिन, हिचा राखलेला यार कोखान, हा एकदां बाकूत्रियामध्ये आला, आणि त्यानें पुष्कळ रान तोडविलें. तेथें एक स्फटिकवत् स्वच्छ पाण्याचा झरा आढळला. त्या ठिकाणीं कोखानानें थोडेसे इराणी लोक ठेवून एक खेडें वसविलें. तेंच मोठें गांव झाले. तेथे पुष्कळ लोक येऊन राहिले. व थोडी- बहुत सुधारणा झाली. त्या वेळीं तेथें झाबूल ह्या नांवाचा सरदार अंमल करीत होता, त्याचेंच नांव त्या प्रदेशा- स पडलें. तो मरण पावल्यावर पुढे काले करून, झा- बूल ह्यांतला झकार नाहींसा होऊन त्याचे जागीं ककार आला. आणि ह्याप्रमाणें त्या प्रदेशाचें नांव काबूल असें पडलें. – सांप्रत काबूलच्या गादीवर दोस्त महंमदखान आहे. हें शहर फारसे देखणें आहे असें नाहीं. यांत बाजार मोठा आहे. त्यांत बहुतेक सर्व जातीचे लोक रस्त्यांत जातपितां दृष्टीस पडतात.