पान:मधुमक्षिका.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०८ )

जो प्रेमाचा लोट आला, तो माझ्यानें सांवरवेना. माझ्या नेत्रांतून अश्रुधारा चालल्या. आणि त्या प्रेमभरामध्यें मी त्यांस आलिंगन देण्यांस पुढे सरलों. इतक्यांत मनांत कांहीं संशय आणि भीति उत्पन्न झाल्यावरून ' ही तसबीर कोणाची ' असें मीं त्यांस पुसले. माझ्या अश्रुधारा पाहून त्या मुलीचाही कंठ दाटून आला.Nतिच्यानें उत्तर देववेना. तिचेही डोळे पाण्याने भरले. तेणें करून माझे मनांतला संशय दूर झाला. आणि मीं तिला पोटाशी धरून कुरवाळून झटलें, ' हे माझे लाडके प्रियकर मुली, मीच तुझा पिता आहे. ' ह्याहून अधिक माझ्यानें बोलवेना. तो मुलगाही माझे पायां पडून, डोळ्यांत आसवे आणून मजजवळ येऊन बसला. तेव्हां जो हर्ष झाला, तसा माझे जन्मांत मला कधीं झाला नव्हता. आणि हैं खचीत आहे कीं, मनुष्यास त्या- च्या मुलांपासून जो हर्ष होतो, तो दुसऱ्या कोणत्याच प्रकारच्या सुखोपभोगापासून होत नाहीं. "
 पहा मनाचा काय चमत्कार आहे तो ! नातें सम- जण्यापूर्वी ज्या स्त्रीविषयीं पापवासना उत्पन्न झाली होती, तिजकडे भलत्याच दृष्टीने पाहणें हें महत्पाप आहे, असें त्या पुरुषास वाटूं लागलें. आणि जो वैरी किंवा प्रतिस्पर्धीसा डोळ्यांत खुपत होता, तो जीवाहून- ही जास्त भासूं लागला.