पान:मधुमक्षिका.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


व्यापार पुष्कळच चालतो. दुकानें व इमारती फारच उत्कृष्ट बांधिलेल्या आहेत. ह्या पेंठा अली महंमदखान ह्याने वसविल्या असें सांगतात. - दोस्त महंमदखान हा शरीरानें सडपातळ, आग्रही, साधा पोशाक घालणारा आणि उग्र मुद्रेचा असा आहे. त्याचा कोणावरही विश्वास नाहीं, ह्यामुळे त्याचे घरांत व दरबारांत त्याला पुष्कळ शत्रु आहेत. तो राज्यव्यवस्थेत हुशार व व्यापारास उत्तेजन देणारा आहे. तो विश्वास ठेवण्या- सारखा मनुष्य नाहीं. ज्यांच्या रक्षणाविषयीं त्यानें कुराणाच्या शपथा दहा लोकांसमक्ष वाहिल्या, त्यांच प्राण घेण्यासही तो चुकला नाहीं. सर्व अफगाणिस्ता- नाचें राज्य आपणास मिळावें, असें त्याच्या मनांत आहे; परंतु, पैशाच्या कमताईमुळे त्याचा इलाज चालत नाहीं. ब्रितिश सरकाराशी त्याचा स्नेह आहे, असें दिसत नाहीं. त्याला पुष्कळ बायका व पुष्कळ मुलें आहेत. त्यांपैकी तीन मुलगे तीन प्रांतांचे सुभेदार आहेत; तथापि त्यांस तो फार सत्ता करूं देत नाहीं. कां कीं, ते कदाचित् आपणावर उठतील, असें त्याला भय वाटतें. - काबुलांत सुनी, शिया आणि हिंदू ह्या तीन जातींचे लोक राहतात. शिया लोकांची निराळीच आळी आहे; तिला खंदाल असें ह्मणतात. लोक सुखरूप नाहींत. बायका फारच व्यभिचारिणी आहेत. त्यांविषयीं त्यांच्यांत एक ह्मण आहे; तिचें तात्पर्य असें कीं, “ पेशावरची कणीक जवसावांचून नाहीं, आणि काबूलची बायको यारावांचून नाहीं. " लोक बहुधा इराणी भाषा बोलतात. परंतु कितीएक