पान:मधुमक्षिका.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०७ )

मला प्रश्न केला की, "आपण खरोखर जर्मनच आहां काय.?" तेव्हां मी होय ह्मणून सांगितलें. तेणें करून त्यांस अंमळसें वाईट वाटले, असें त्यांच्या चर्येवरून मला दिसले. पुनः एके दिवशीं त्या दोघांनीं एक 'तसबीर आणिली; आणि ती एके खिडकीत ठेवून तीं पाहात उभी राहिली. नंतर, एकदां तसबिरीकडे पा- हावें, पुनः मजकडे पाहावें, असा प्रकार त्यांनी आरंभि• ला. तेव्हां, मीं मनांत झटलें, त्या तसबिरींत आणि माझ्यांत कांहीं सादृश्य तर नाहींना ? इतक्यावरही माझ्याने राहावेना. तेव्हां, ' तुह्मी एकदां मजकडे आणि एकदां त्या तसबिरीकडे कां पाहतां ?' असें मीं त्यांस स्पष्ट विचारिलें. त्या वेळीं त्या तरुणीनें उत्तर केले की, 'जर आपण फ्रेंच असतां, तर ही तसवीर आपली नाहीं, असें कोणाच्यानेही ह्मणवतेंना, इतकी ती तुमच्या स्वरूपाशीं मिळत आहे. ' हैं ऐकतांच मला मोठें नवल वाटलें. आणि ती तसबीर पाहण्या- करितां मीं तिजपाशीं मागितली. ती तिनें माझे हातांत देतांच मीं ती मोठ्या उत्कंठेने पाहिली. व्हां, ती माझीच तसबीर, सुमारें पांच वर्षांपूर्वी, राणी साहेबांच्या सांगण्यावरून, मीं आपले मुलांस पाहण्याक- रितां पाठविली होती, अशी माझी पुरी ओळख पटली. नंतर मी त्या उभयतांकडे दृष्टि लाविली. तेव्हां माझ्या शरीराच्या कितीएक खाणाखुणा त्यांच्यांत मला दिसून आल्या. तेणेंकरून मला जो आनंद झाला, व जें आश्चर्य वाटलें, त्याचें मला वर्णन करितां येत नाहीं. 'ह्रीं मुलें माझीं नव्हत काय' असें मनांत येऊन पोटामध्यें-