पान:मधुमक्षिका.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०६ )

विचारावी, आणखी इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगाव्या, अशा तिच्या आचरणावरून मला तिचा मोठा नाद लागला. तूं कोणाची कोण, असें मी तिला विचारों, तेव्हां मी सुभेदारिणीची भाची आहें, असें ती मला सांगे. "
 "मला वाटतें कीं, मी बरा झालों, तो औषधापेक्षां ति- च्या योगानें फार लवकर सांवरलों. माझा ताप गेला, तेणेंक- रून मला तर आनंद झालाच झाला; पण त्या तरुण रूप- बतीस पराकाष्ठेचा हर्ष झाला. ती वारंवार मजकडे येई; तेणें करून मला अधिकाधिक बरे वाटे. आणि तिच्या - अशा मनोरम आचरणावरून माझें अंतःकरण तिजवर इतकें किदा झालें कीं, तितकें दुसऱ्या कोणत्याही स्त्रीवर पूर्वी झालें नव्हतें. परंतु, कांहीं दिवसांनीं, तिच्याच बयाचा एक छानदार तरुण मनुष्य तिच्या मागें मागें हिंडतांना मी पाहिला. तेव्हां तो तिचा आवडता दोस्त असावा, असे मला वाटलें. आणि असें मनांत आलें की, ही जी मजवर इतकी प्रीति दाखविते, ती सर्व खोटी कपटाची आहे. आणि विशेष संशय प्राप्त होण्यास कारण असें झालें कीं, तीं उभयतां माझ्या खोलीच्या एका दूरच्या कोपऱ्यांत जाऊन कुजबूज करीत, हंसत, ब थट्टा करीत, हैं मीं स्वतः नजरेनें पाहिलें होतें. तथापि तो पुरुष इतका सुस्वरूप आणि भला दिसे कीं, माझ्या मनांत भरलेल्या सुंदरीवर त्याची पापदृष्ट नाहीं, असें जर मला पक्के वाटलें असतें, तर हरप्रय- न करून मी त्याशीं स्नेह संपादिला असता."
 "एके दिवशीं तीं उभयतां एकत्र उभी असतां, त्यांनी