पान:मधुमक्षिका.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०५ )

 " माझे ज्वरास चार दिवस झाल्यावर, व्हेनोस्कीची सुभेदारीण त्या मार्गानें चालली होती, तिला माझी दीन दशा कोणी सांगितली. ती ऐकून ती मजकडे आली. तेव्हां ती माझ्या बायकोची कोणी अगदी जवळची आप्त असून, तिजकडे ती हमेषा येतांना मी पाहिली होती, असें तिच्या मुद्रेवरून मला पक्के स्मरलें. परंतु तिनें आपणास ओळखिलें नाहीं, त्यापक्षी आपणही तिला ओळख देऊं नये, असा मी निश्चय केला. आणि मी जर्मन मनुष्य असून वाटेंत लुटला गेलों, व आजारी पडलों आहें, कृपा करून मला वार्सा येथें आपण पोहोंचता कराल, तर हे उपकार, राणीसाहेब माझ्या ओळखीचीं आहेत, त्यांजपाशीं देखील मी मोठ्या आनंदानें वर्णीन, असें मीं तिला सांगितलें. तिला माझी दया आली. तिने मला डोलींत घालून वार्सा येथें नेऊन, मी बरा होईं तोंपर्यंत, पथ्या पाण्याची सोय करून आपले घरीं ठेविलें "
 “ वार्सा येथें पोहोंचल्यावर, वाटेच्या हालांमुळे बरे- च दिवस मला ताप येत होता. सुभेदारीणबाई समाचारास हरहमेष येत असे. तेव्हां तिजब-रोबर, सतरा अठरा वर्षांची एक छानदार तरुण स्त्री, लावण्याची केवळ खाण, अशी माझ्या नजरेस पडत असे. मी इतका आजारी होतों, तरी त्या तरुणीकडे . माझे लक्ष लागे. तिला पाहिल्याबरोबर माझ्या सर्व दुःखांचें भान मला नाहींसें होई. माझे दुखण्यामुळें तीही फार दिलगीर आहे, असें तिच्या चर्येवरून मला दिसे.. तिनें नित्यशः माझे खोलींत यावें, माझी प्रकृति