पान:मधुमक्षिका.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०४ )

आहे. ही प्रीति इतकी बलवत्तर आहे कीं, मनुष्याच्या मनांत ज्या शतशः वाईटबऱ्या वासना उत्प होतात, त्या सर्व हिपुढें तृणवत् भासतात. ह्याची सत्यता पाहणें असल्यास, आईबापें, मुलांवरचें संकट निवारण्यासाठीं कोणकोणती दु:खें भोगण्यास तयार होतात, त्यांजकडे सूक्ष्म दृष्टि पोहोंचवावी, ह्मणजे तात्काळ खातरी होईल.
 हे विचार आमचे मनांत उभे राहण्यास, एक गोष्ट आमच्या वाचण्यांत आली. ती बरीच चमत्कारिक आहे, ह्मणून येथें लिहितों.
 कोणी एक फ्रेंच सरदार फ्रान्स देशच्या राज- कन्येबरोबर पोलंद देशास गेला. तो मोठा विषयी आणि तऱ्हेवाईक मनुष्य होता. पोलंदांत राजकन्येच्या त्याआतांनवऱ्याने त्याचा चांगला सन्मान ठेवून, तेथील एका मानकऱ्याच्या मुलीशीं त्याचें लग्न लावून दिलें. ठिकाणी कांहीं वर्षे लोटल्यावर त्याची बायको एकाएकीं मृत्यु पावली. तेव्हां तो तेथून निघून स्वदेशीं आला. तेथें बापाच्या हातची जी कांहीं मालमत्ता होती, ती चैनबाजींत उडवून, तो अगदीं दरिद्री झाला. दुसरा कांहीं उपाय चालत नाहीं, असें पाहून, तो विल- क्षण पुरुष, बायकोची कांहीं जिनगी पोलंदांत असेल, ती पाहावी असें मनांत आणून तिकडे जावयास नि- घाला. पोलंदाची राजधानी वार्सा येथे पोहचण्या- पूर्वीच चोर लोकांनीं त्याला वाटेंत लुटिलें. आणि तो ज्वरानें आजारी पडला. ह्यापुढची हकीकत यानें स्वतःच लिहून ठेविली आहे. ती अशी,