पान:मधुमक्षिका.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०३ )

स. जर देव अनुकूल नाहीं, तर मनुष्य आणि किडा सारखाच. अतिशयित स्वार्थबुद्धि मनुष्य आपलें वांगे भाजून घेण्यासाठी लोकांच्या घरांला देखील आग लावील. नव्या गोष्टी व पाहुणे ह्यांजवर लोक वाखाणणीची मात्र वृष्टि करितात; त्यांजवर त्यांची मनांतून प्रीति नसते. देशांतील लोकांची आपसांत लढाई, ही तापाच्या आगीसारखी होय; तिनें श क्षीण होते; परंतु, परके देशाशी लढाई ही, उद्योगानें आंगांत उष्णता येते, तीप्रमाणें आहे; ती शरीरास आरोग्यकारक होते. जो तसबिरींत दाखवितां येत नाहीं, तो सौंदर्याचा सर्वोत्कृष्ट भाग होय.


तसविरीची साक्ष.

 जन्मांधाला जशी रंगाची कल्पना मनांत आणितां येत नाहीं, त्याप्रमाणे ज्यास मुलें झालीं नाहींत त्यास त्यांचें सुखदुःख, कोणी कितीही खरें सांगितले, तरी बरोबर समजावयाचें नाहीं, ह्यांत कांहीं विशेष नाहीं. कां कीं, श्रद्धाग्राह्यज्ञानांत आणि अनुभवजन्यज्ञानांत सर्वदा महदंतर असतें. आई आपल्या मुलाशीं बोल- त आहे, तें बोबडी भाषणे करीत आहे, आणि त्यांच्या श्रवणानें तिला परम आल्हाद होत आहे, असें पाहून कोणाही सज्जनास आनंद झाल्यावांचून राहणार नाहीं. मुलांविषयीं आईबापांच्या मनांत परमेश्वरानें जी अप्रतिम प्रीति ठेविली आहे, तिचें वर्णनही करणे फार कठीण आहे. तिचा अनुभव केवळ आईबापांसच येऊ शकेल; इतरांस तो अप्राप्त