पान:मधुमक्षिका.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०२ )

माझ्या मताचे खंडन कर; नाहींतर माझी रकम मला ह्या क्षणीं परत दे."
 आतां, बेकन नामक महाज्ञानी पुरुषाचीं कांहीं स्फुट वाक्यें घेऊन हा लेख संपवितों.
 फार वांकविल्याने धनुष्य मोडतें; तसें, फार मोक- घडते. फारच दुःख दिलें तर निरपराधी मनुष्य देखील लबाडी कबूल करतो. छानदार मुखचर्या ही मुकी शिफारस आहे. लक्ष्मी ज्याला हातीं धरते, त्याला वेड़ें करून सोडते, ज्यांवर फिर्या- द करतां येत नाहीं, त्यांजकडून इजा होणें हें अत्यंत दुःखकारक आहे. संकटांतून मुक्त होण्याची आशा फक्त सद्गुणीजनांस मात्र असते. सूड उगविण्यांत “जलदी घात घेते. गरीबीमध्यें, सहज हंसणें, हा देखील अपराध आहे. उशीर हा वाईटच; तथापि, कोणतेही काम करण्यास जितका जितका उशीर होतो, तितकें तितकें, तें काम करण्याविषयीं आपण वाकिफ जास्त होतों. अरे देवा मला मरण दे, असें झणण्या- पूर्वी जो मरतो तो सुखी, लबाडाने साधुत्वाचें सोंग घेतलें, ह्मणजे त्याच्या दुष्टत्वाची कमाल झाली.. सर्वां चा डोळा ज्या वस्तूवर असेल, तिचें रक्षण केवळ कुलूप- किल्लीनें होणें नाहीं. ज्यांला पुष्कळ लोक भितात, त्यानेही पुष्कळांस भ्याले पाहिजे. भितरा मनुष्य आपणास सावध ह्मणवितो; व कवडीचुंबक, आपणास मितव्ययी ह्मणवितो. जें मोठचा आर्जवानें नाहीं झटलें, तें अर्धवट दिलें, असें समजावें. हे आयुष्या, तूं दुःखितास तपांसारखें आणि सुखी जनांस पलवत् आहे