पान:मधुमक्षिका.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०१ )

ल्यावर तरी जें खातों, फार बेतानें थोडीशी भूक शिल्लक राही असें खातों." हे ऐकून " वैद्य बोलला, तर माझे येथे कांहीं काम नाहीं; हा मी आपला गाशा गुंडाळून निघालों पाहा."
विद्येची किंमत.-सादी ह्मणून एक मोठा विद्वान होता.. त्याला एकाने विचारीलें, “महाराज, विद्वानलोक श्री- मंतांचे दारोदार हिंडतात; पण श्रीमंत जे आहेत ते विद्वानांच्या घरींदेखील कधीं जात नाहींत, ह्याचे कारण काय.?" तेव्हां तो ह्मणाला, “धनाची किंमत विद्वानांला समजते; परंतु, विद्येची किंमत श्रीमंतांला कळत नाहीं, ह्मणून असें होतें. "
 वादप्रतिवादाची हौस. - आदिसन आणि तेंपल ह्या दोन विद्वान साहेबांचें मोठें सख्य होतें. त्यांची गांठ पडली, ह्मणजे ते एकामेकांच्या मतांविषयीं वादविवाद करीत बसत. एके समयीं तेंपल साहेबास १०००० रुपयांची गरज लागली; ती आदिसन साहेबाने रुप- ये उसने देऊन चालविली. पुढें कांहीं दिवस लोट- ल्यावर तेंपल साहेब आदिसन साहेबापाशीं, पहिल्या- प्रमाणें मन मोकळे करून बोलेनासा झाला; व प्रतिवाद करून आपलें मत खरें करून दाखविण्याविषयीं फार संकोच करूं लागला. एकदा तर असें झालें कीं, ज्या विष- यांत त्यांचीं मतें नेहमीं विपरीत असत, त्याविषयीं वाद चालला असतां, जें जें आदिसन बोलला, तें तें तें -पलसाहेबानें निमूटपणें मान्य केलें. हें पाहून आदिसन साहेबास फार वाईट वाटुलें. आणि तो तेंपल साहेबास ह्मणाला, “मित्रा, ह्या प्रसंगीं नेहमीप्रमाणें