पान:मधुमक्षिका.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०० )

होता, ह्मणून तो लोकांस चांगला वाचतां येईना. ह्मणू- न बादशाहानें तो आपले नौकरांकडून तेथून काढून खालीं, वाचतां येईसा : डकविला. आणि फेदरिक ह्मणाला, “माझा व माझ्या प्रजेचा तह झाला आहे; तो असा कीं, त्यांनीं मनास येईल ते बकावें, आणि मीं माझ्या मर्जीस येईल तें करावें. हा तह आह्मांस कबू- ल आहे."
 ज्ञानप्रीति. - शिकंदर बादशाहा ह्याचा लहानपणीं थोडासा अभ्यास झाल्यावर, त्याला नीतिशास्त्र व तर्कशास्त्र शिकविण्याविषयीं त्याचा बाप फिलीप ह्यानें, आरिस्तातल नामक एका महाज्ञानी पुरुषास पत्र लिहिलें. त्यांत तो असें ह्मणतो कीं, "ज्या युगां- .त आपण आहां, त्या युगांत परमेश्वरानें मला पुत्र दि ला, ह्यासाठीं मी त्याचे जितके आभार मानितों, तित- के, त्याने मला केवळ पुत्र दिल्याचे मी मानीत नाहीं."
 अनुभव - प्राचीन काळीं कायकाय गोष्टी घडल्या हें न जाणतां जगांत राहणें, हें सर्व आयुष्य बाळपणांत घालविण्यासारखें आहे. गतकाळीं झालेल्या श्रमांचा- जर कोणी कधींच उपयोग न करता, तर हें जग आ- रंभापासून शेवटपर्यंत अगदीं बाल्यावस्थेतच राहिलें असतें........ •.• सिसरो.
  आरोग्य - पर्शिया देशच्या एका बादशाहानें एक उत्कृष्ट वैद्य एके गांवीं पाठविला. तो तेथे पोहल्यावर तेथील लोकांस विचारूं लागला कीं, "तुझीं कसे काय राहतां ?” तेव्हां त्यांनीं उत्तर केलें कीं, "आह्मी भूक लागल्याशिवाय कांहीं खात नाहीं; आणि भूक लाग-