पान:मधुमक्षिका.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९९ )

स्तुति आणि निदा.- मनुष्य जवळ असतां त्याज- पाशीं जसे तुह्मी वागता, तसे त्याच्या पश्चातूही वागा. बिशप विव्हरिज्ज ह्मणतो, “मीं कोणाही मनुष्याची तोंडावर स्तुति व पश्चात् निंदा न करण्याविषयीं निं- श्चय केला आहे." हा निश्चय सर्वोत्कृष्ट होय. हा जर सर्वांनी पाळिला, तर तोंडपुजेपणा आणि निंदा ह्यांस ह्या जगामध्ये थारा मिळणार नाहीं.
 गरीबी - श्रीमंतास बाकी सगळ्या कल्पना करतां येतील. परंतु, गरीबींत दुःखें कोणतीं सोसावीं लाग- तात, ह्याविषयीं त्याला बरोबर कल्पना करतां येणारनाहीं... आनन.
 अहिल्याबाई होळकरीण. - दुसऱ्या बाजीरावाचा बाप रघुनाथराव ह्या अहिल्याबाईवर स्वारी करण्याचा बेत केला, तो तिला कळला. तेव्हां तिनें त्यास सांगून पाठविलें कीं, " मी स्त्री अबला आहे. करून आपण मला पराजित केलें, तर मोठा पुरुषार्थ आहे असें नाहीं. मजवर स्वारी त्यांत आपला परंतु, ईश्वरकृपेनें जर आपण माझे हातून पराभव पावलां, तर मात्र त्या अपकीर्तीला जोडा नाहीं. ह्याचा विचार करून करणें तें करावें. " हा निरोप पोहोंचतांच राघोबानें स्वारीचा बेत रहित केला. फेदरिकधिग्रेत.- हा प्रुशियाचा बादशाह मोठा प- राक्रमी होता. त्याचे नांवाचा कांहीं बीभत्स जाहीर- नामा कोणी दुष्ट मनुष्याने त्याचेच वाड्याच्या एका मितीस उंच चिकटविला होता. तो पाहण्यासाठी लोक जमले, तेथें बादशाहही गेला. जाहीरनामा फार वर
-