पान:मधुमक्षिका.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९८ )

अज्ञानमूलक आहे. कांकीं, ज्यांस एकच भाषा येत होती, असे अनेक तत्वज्ञानी पूर्वीच्या काळांत होऊन गेलेले प्रसिद्ध आहेत. आणखी, लातिन, ग्रीक, हीब्रू, संस्कृत, हींच गृहें केवळ ज्ञानास आवडतात, दुसरीं आवडत नाहीत, असें मानणेंही अप्रशस्त आहे.

- फुलर.

 श्रीमंत आणि गरीब. ज्याची मिळकत खर्चाहून जास्त, तो श्रीमंत, आणि ज्याचा खर्च मिळकतीहून जास्त, तो गरीब. ब्रूयर. स्थिति - प्रकृतीस मानण्यासारखी स्थिति ज्याला प्राप्त असेल, तो सुखी खरा; परंतु, प्राप्त झालेल्या स्थितीप्रमाणे जो आपली प्रकृति करितो, तोच शाहणा जाणावा.

ह्यू.म.

 संगति.—जनाच्या द्वाडपणाविषयीं तुह्मी पाहिजे कां बोलाना ; परंतु जन्मास येण्यापूर्वी द्वाड नसतो, हे सर्वांनीं लक्षांत ठेवावे. मनुष्य जन्मतो, तेव्हां त्याचा स्वभाव ऊन लाखे- प्रमाणे अगदी मऊ असतो. तो ज्या प्रकारच्या मंडळीच्या सांवांत दैवयोगानें पडतो, त्याप्रमाणे त्याची आकृति बनते.
 वार्धक्य - वार्धक्य हे एक मोठें जुलुमी सरकारच आहे. त्याच्या ताब्यांत आलेलें मनुष्य तरुणपणाचे ढंग करू लागले, तर त्याला तात्काळ देहांतशासन होतें........चीफोकल्द.