पान:मधुमक्षिका.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९७ )

कायदे. - कायदे हीं कोळ्यांची जाळीं होत. त्यां- तमाशांप्रमाणे साधे मोळे जे कोणी असतात, ते मात्र बिचारे गुंततात. पण गांधीलमाशीप्रमाणे जे अस्सल पटाईत लुच्चे असतात, ते त्यांतून तेव्हांच निसटून जातात.

स्विफ्त.

 दुष्कर्म. - " परमेश्वर पाहत नसला, आणि मनुष्याकडून शिक्षा होण्याचेंही भय नसले, तरी मी • पापकर्म करणार नाहीं." असें, सेनिकानामक रोमन तत्ववेत्ता आपले ग्रंथीं लिहितो.
 मनोवृत्ति.. - आपल्या कितीएक मनोवृत्ति आपण • आंकळितों, हा आपला पराक्रम नव्हे; तर, त्या मनो- वृत्तींचें दुर्बलत्व होय.
 पीतरधियेत्त राजा. - रुशिआ देशचा बादशाह पीतराधेयेत, हा हालंद देशामध्यें सार्दम ह्या गांवीं गलबतें बांधण्याच्या कारखान्यांत वेष बदलून गलबतें बांधण्याचें काम शिकत होता. तेव्हां एके दिवशीं त्यानें दुसऱ्या एका कामगाराचें एक हत्यार, त्यास न विचारितां कामास घेतलें. तें त्या कामगारास समजलें तेव्हां त्याने क्रोधाविष्ट होऊन राजास न ओळखितां त्याच्या एक ताडकन तोंडांत दिली. त्या समयीं तो परम नीतिमान आणि सहनशील राजा, मोठ्या गांभीर्याने त्या कारागिरास ह्मणाला, " अरे शाबास; मीं अपराध केला, त्याचें योग्य शासन तूं मला दिलें." असें बोलून त्याने त्याला बक्षीसही दिलें.
 अनेक भाषा ज्याला अनेक भाषा समजत नाहींत स्याला फारसे ज्ञान नसते, असे समजणे हे अगद