पान:मधुमक्षिका.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९६ )

लागला, तर त्यांतूनच तो एक अत्युत्कृष्ट पुतळा बाहेर काढितो; नाहीं तर तो तसाच फुटून तुटून नाहींसा होतो. तद्वत् जीं मनुष्ये रानटी, अज्ञान, आणि मूर्ख असतात, तींच उत्तम गुरूच्या सुशिक्षेनें, कदाचित् उत्तमोत्तम होतील.

स्पेक्तेतर.

 मौन. - झेनो झणून एक ग्रीक तत्वज्ञानी होता. तो ह्मणत असे कीं, “मौन हा मोठा सद्गुण आहे ; कां कीं त्याच्या स्वीकाराने, इतरांचे दोष आपणास कळतात, . पण आपले इतरांस समजत नाहींत. "
 शाहणे व मूर्ख.- मला कांहीं ज्ञान नाहीं असें ज्या शाहण्या मनुष्यास वाटतें, तो शाहाण्यांत शाहणा होय; आणि, माझेसारिखें ज्ञान कोणालाही नाहीं, असें ज्या मूर्खाला वाटतें, तो मूर्खात मूर्ख होय. परीस. - त्युरीबचा बादशाह महंमद बाय, ह्यास त्याच्या प्रजेनें पदच्युत केलें. त्याजपाशीं परीस आहे, अशी लोकांत प्रसिद्धि होती. त्याच्या आशेनें व तो देण्याचा करार करून घेऊन, अलजियर्सच्या सुभेदारा- नें महंमदास पुनः गादीवर बसविलें; तेव्हां त्यानें त्या सुभेदाराकडे एक नांगर मोठ्या समारंभाने पाठवून दिला.
 तोंडपुजे लोक. - ग्रीसच्या विद्वत्सप्तकांत बियास नामे करून कोणी तत्ववेत्ता होता. त्यास एकानें विचारिलें, अतिभयंकर जन कोणते ? त्यानें उत्तर दिलें, “परक्यांतला प्रबळ वैरी, आणि ओळखीच्यांत- ला तोंडपुजा, है भयंकर शत्रु होत, "