पान:मधुमक्षिका.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९५ )

नसाची निष्ठा नीतीवर किती आहे, तें पाहण्याकरितां तिनें एवढी खटपट केली होती. परंतु, शेवटीं तिची अशी खातरी झाली कीं, एक वेळ हत्ती सुईच्या ने- ड्यांतून निघून जाईल, पण हा साबिनस नीतिच्युत होणार नाहीं. त्याची धर्मनिष्ठा पाहून तिला मोठें आश्चर्य वाटलें. आणि ती मनांत ह्मणाली कीं, आज- पावेंतों जो मी ह्यांचा छळ केला, तो केवळ अन्याय होय; हा मोठा पुण्यशील आहे. ह्याजवर ममता करणें आणि ह्यास साह्य देणें हेंच माझें कर्त्तव्य होय. असा विचार करीत, ढळढळां आसवें गाळीत, ती त्यांच्या खोलींत गेली, आणि साबिनस ह्यास पोटाशी धरून त्याचें तिनें समाधान केले; व त्यास त्या कारागृ- हांतून सोडवून आपले सर्व दौलतीचा मालक केलें. नंतर, साबिनस आणि ओलिदा ह्यांनी आपले सर्व आयुष्य सुखांत घालविलें.


वाक्यरत्नावली.

 थोरांची वचनें केवळ ज्ञानभांडारें होत. त्यांचा ठसा मनुष्याच्या मनावर चांगला होतो. हे सर्वानुभव- सिद्ध आहे. लणून, याविषयीं प्रस्तावना फार न लांब वितां, कितीएक विद्वान् जनांचीं बोधादि प्रकरणी वाक्यें इंग्रजी ग्रंथांतून येथे मराठींत उतरून घेतो. त्यांत कि- ती एकांचे कर्ते खालीं सांगितले आहेत, व कितीएकांचे सांगितले नाहींत.
 सुशिक्षण - दगड दिसण्यांत प्रथमतः अगदीं ओवड धोबड असतो. तो जर उत्तम मूर्तिकाराचे हातीं