पान:मधुमक्षिका.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९४ )

आभार मानी. ह्याप्रमाणें दिवस लोटतां लोटतां, त्यांनी जी पोटगी घराहून आणिली होती, ती सरून गेली. उपास पडूं लागले. एके दिवशीं तर असें झाले कीं, तीं उभयतां उपाशीं असून, त्यांचा एकुलता एक लहान मुलगा होता, त्यालाही कांहीं खावयास नस- ल्यामुळे, त्याने भूकभूक ह्मणून एकच आकांत केला. आईबापें स्तब्ध बसली. त्यांच्या पोटांतून दुःखाचे उमाळे येत; पण करतील काय ? अशा अवस्थेमध्यें कोणी एक हुजऱ्या त्यांच्या खोलींत आला. आणि त्यानें साबिनसास असें सांगितले की, 'आपली आरि- आनाबाई मरण पावली; तिने एका दुसऱ्या मनुष्याचे नांवाचें मृत्युपत्र करून ठेविलें आहे; तो दूर देशीं आहे; आणि तें मृत्युपत्र तुमच्या हातीं लागण्यासारखें आहे. तेवढे घेऊन जर तुह्मी जाळून टाकाल, तर तिची सर्व दौलत तुलांस लाभेल; कारण, तुमचे इतका जवळच्या नात्याचा तिचा येथें दुसरा कोणी नाहीं.' हे शब्द कानी पडतांच त्या दोघांच्या अंगांव- र रोमांच उभे राहिले. साबिनसानें, त्या जासुदा- कडे रागानें पाहून लटलें, जा, जा, जा; जा येथून तूं निघून लवकर. हें ऐकतांच तो निघून गेला. नंतर तीं दादलाबायलें एकमेकांच्या गळां पडून फार शोक करती झालीं. आतां आपणांस साह्य मि ळण्याची आशा देखील करावयास जागा उरली नाहीं, असें साबिनस ह्मणाला.
 हें सर्व कृत्य, शेजारच्या खोलींतून आरिआना हिनें पाहिलें. हुजऱ्या तो तिनेच पाठविला होता. सावि-