पान:मधुमक्षिका.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९३ )

हा कारागृहवास आपले योगानें माझे कपाळीं आला. आहे असें नव्हे; तर ह्याच्या उलट, ह्मणजे, माझ्यामुळे हा आपणांस भोगावा लागत आहे. हैं माझें झणणें खरें किंवा खोटें ह्याचा आपण विचार करा. आपण मला सोडतां, तर आरिआनाबाईचें द्रव्य आपणांस मिळालें नसतें काय ? परमेश्वरानें जी स्थिति दिली आहे, ती फार चांगली आहे. तींत आपण तृप्त राहावें. हीस वाईट ह्मणणें हें ईश्वरास वाईट ह्मण- ण्याप्रमाणे आहे. आपणांस कारागृहवासाचे इतकें दुःख होऊं नये. आपण खून, चोरी, मारामारी, इत्यादि परम दुःखद अपराध वुद्धिपुरःसर करून तुरुं गांव पडलो आहों असें नाहीं; ज्यानें आपणांस धरून बसविलें आहे, त्याची रकम बुडवावी अशी आपली बासना नाहीं. परंतु पैसा जवळ नाहीं, त्यास आपण काय करावें ? दुसऱ्याची हानि व्हावी, असा हेतु मनांत धरून जें कृत्य मनुष्य करितो, तो अपराध होय, हें नीतिशास्त्राचें ह्मणणे जर खरें आहे, तर आपण अप- राधी नाहीं. असो. आपण किमपि दुःख करूं नये. मी आपली सेवा करावी, आपण मजवर प्रीति करा- बी, आणि उभयतांनीं सदाचरण व परमेशभजन ह्यांत काळ घालवावा, हीच माझी इच्छा व आपणांस विनंती आहे. आपलें हास्यमुख तेंच माझें सुख, आणि आपलें औदासिन्य तेंच माझें दुःख होय.”
 असे भाषण ऐकून साबिनस फार संतुष्ट होई; आणि आपणास इतकी रूपवती,बुद्धिमती, आणि नी-तिमती बायको मिळाली, ह्मणून वारंवार तो ईश्वराचे