पान:मधुमक्षिका.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९२ ) आणि खुशाल असावें; बोलण्याचा राग धरूं नये; आतां मी जातों." असे बोलून तो चालता झाला. आपला बेत ह्याप्रकारें निष्फळ झाला असे पाहून, भारिआना बाईला मोठी खिन्नता प्राप्त झाली. रागानें तिनें असें तोंड सोडिलें कीं, साबिनस हा विचारशील होता तरी, तोही अगदीं वर्दळीस आला. दुसरे दिवशीं मोठीच चकमक झडणार होती; तों त्याच दिवशीं सावकारानें दरखास्त बजाऊन साबि- नसाला तुरुंगांत नेऊन बसविलें. ह्या दुःखांत सुख एवढेच होते की, त्याची प्रियपत्नी ओलिंदा, हिलाही त्याबरोबर जाण्यास परवानगी मिळाली. गरीबीचें जेवण तयार करी, व इतर गृहकृत्यांत गुंते तेव्हां तो तिला नानाप्रकारच्या रमणीय गोष्टी वाचून दाखवी, तेणेंकरून तिला त्या कामांचे फारसे श्रम वाटत त्या उभयतांची परस्पर प्रीति, व दैवानें प्राप्त झालेल्या स्थितींतील तृप्ति, ह्या पाहून इतर कैदींस फार चमत्कार वाटे व संतोष होई. त्या बंदीखान्यांत एकाद्याकडे जरा कांहीं कमजास्त असले, ह्मणजे त्यानें इतर मंडळीच्या आधीं, साबिनस व त्याची स्त्री ह्यांस . बोलावावें. इतकें दारिद्र्य होतें, तरी तीं एकमेकांवर कधींही रागावत नसत. माझेमुळे तुला कारागृहवास ती त्याचें नसत. तेव्हां भोगावा लागला, असें ह्मणून, साविनस कधींकधीं आपल्या बायकोपाशीं फार कष्टी होत असे. ओलिंदनें त्याचें समाधान करावें कीं, "अहो, काय सांगावें , ? मला ह्या कारागृहापेक्षां आपलें असें भाषण फार दुःख देतें; आपण असे कधींही मनांत आणूं नये,