पान:मधुमक्षिका.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९१ ) तुरंगाचें वारंत आणिलें. तेव्हां, आतां अब्रू जाते, या प्रसंगी आपणास आपली आरिआना साह्य करील, असे त्याला वाटून त्यानें तिची प्रार्थना केली. तिनें त्याला हें ऐकतांच 66 तात्काल असें सांगितलें कीं, तुला पुरून उरण्यासारखें द्रव्य मजपाशी रोख आहे, व शिवाय दरसालचें उत्प नही बरेंच आहे. पण जर तूं ओलिंदेला सोडून देशील, तर तें मी सर्व तुला देईन; नाहीं तर एक कवडी देखील मिळावयाची नाहीं. साबिनसाच्या आंगावर रोमांच उभे राहिले. आणि तो ह्मणाला, 'छी, छी, आरीआना बाई, हें तुमचें भाषण माझ्या हृदयात वज्रासारखे वाटतें; असें पुनः बोलूं नका; नाहीं मला तुमच्या द्रव्याची गरज; तुरुं- गांत पडलों तर अब्रू जाईल, जावो; नापत होईल, होवो; लोक तुच्छ मानितील, मानोत; जें होईल तें होवो; पण मी जिवांत जीव आहे तो पावेतों ओलिं देला अंतर देणार नाहीं. जिचे धर्म, अर्थ, काम, पुर विण्याविषयीं, मी सर्व जनांसमक्ष, सर्वांतरसाक्षी जो परमात्मा त्याची शपथ वाहिली, जिनें आपली मान माझ्या हातांत दिली, जी माझ्या अंतरात्म्यानें माझीशी झटली, जी माझ्या सुखदुःखास आजपावेतों वांटेली झाली, व जिनें आपलें तनमन माझ्या सुखार्थ खर्चि ण्याचा निश्चय केला आहे, अशा माझ्या प्रियकर ओलिंदानामक सजीव तेजःपुंज रत्नराशीस, ह्या तुझ्या यःकश्चित् निर्जीव धातूंच्या तुकड्यांच्या लोभानें म्यां टाकावें काय ? हर हर !! आरिआना बाई, हे शब्द तुमच्या तोंडांतून निघाले तरी कसे ? असो; आपण