पान:मजूर.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मजूर “मी त्याला सांगितलें कीं, आमच्या आईच्या मैत्रिणीच्या मुलाशीं माझ्या बहिणीचा वानिश्चय झाला आहे ! " दादानें उत्तर दिलें, " मग ? " मी उत्सुकतेनें पुढें विचारलें. 66 मग काय ? त्यानं विचारलें, तो मुलगा केवढा आहे, कुठे आहे, माझ्या इतका श्रीमंत मोठा - कर्तबगार आहे का ? तुला त्याच्यापासून फायदा झाला आहे का ? होणार आहे का ? " “ बरें पुढें ? तूं काय सांगितलेंस १ -" " मी म्हटलें तो फार मोठा माणूस आहे. कॅप्टन आहे. दोन अडीच हजार रुपये पगार आहे, झांझिबारला असतो. चार पांच वर्षात इकडे येणार आहे ! दादा म्हणाला. ११ 66 मग तो काय म्हणाला ? " काय म्हणणार ? तो म्हणाला, तो झांझिबारहून परतच आला नाहीं तर ? नाहीं तर परत येतांना बोट बुडून समुद्रास्तृप्यतुच झाला तर ! " दादानें त्याचें म्हणणे सांगितलें. " आजची माझ्या बाबतींतलीं सोन्य सारखी सधी कां वायां घालवता आहेस ? खरें म्हटले तर आपलें शेटजीच माझ्या पाठीमागे लागले आहेत, त्यांची मुलगी-आपली बबू- ताई करून घेण्याबद्दल ! पण तिच्यापेक्षां तुझीच बहिण माझ्या पसंतीस उतरली आहे म्हणून म्हणतों ! ---" 66 हं ? इतका पाजी, नीच, हलकट, पशू आहे का ? " मी म्हटलें ! मग काय त्याच्या बाबतीत बोलणेंच संपलें. तूं तर त्याला वाटाण्याच्या अक्षता चिकटविल्यास ना ? " " होय ! पण, " दादा आणखी कांहीं बोलणार होता. 66 पण दादा, तो तुला कांहीं तरी त्रास देईल नाहीं ? " मी विचारलें. काय होईल तें खरें ! " दादा म्हणाला आमच्या मॅनेजरला कुणीही नीटनेटकी, थोडीशी व्यवस्थित नाकाडोळ्यांनी तरतरीत, झुळ- झुळीत एवढेसें ठाकठिकीनें ल्यालीनेसलेली मुलगी पाहिली की ती आप- ल्याला योग्य आहे, असेंच वाटतें. मग ती एकादी तूं ऐस, नाहीं तर शेटजींची बबुताई असो. जगांतल्या सुंदर स्त्रिया आपल्या योग्य आहेत,