पान:मजूर.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ९

८७


हीच त्याची समजूत. आपण त्यांच्या योग्य आहोंत कीं नाहीं, याचा कधीं तो विचारच करीत नाहीं ! असा आमचा मॅनेजर मजेदार माणूस आहे ! "
 इतका आहे तरी तुला तो मजेदारच वाटतो का ?""मी पृच्छा केली.
 आपण आपलें मजेदारच म्हणावें ! आपल्याला काय करायचे ?- कोणी, कस ही असला, तरी आपण त्याच्याकडे चांगल्याच दृष्टीने पहावें, त्यांच्यांतला मजेदारपणा पहावा, आणि आपल्या मनाची, व दुसन्याची घटकाभर करमणूक करून घ्यावी ! दुसरें काय ? " दादाने समारोप केला.
 दादा, इतके हैं कांहींच्या कांहींच सांगितलेंस – मला रडविलेंस, दुष्ट, खट्याळ म्हणून घेतरेंस, पण शेवटीं उशीराचं, आणि खरें उदास होण्याचें कांहींच कारण सांगितलें नाहींस ! -" माझी त्या बद्दलची रुखरुख कुठे राहिली होती १ म्हणून मी विचारलें. आमचीं जेवणें झाली होतीं. आम्हीं हात धुतले मी उष्टीं गोळा केलीं, शेण लावलें. दादाला सुपारी दिली. दादा सांगेना तरी त्याला सारखी तेंच तेंच विचारीत सुटलें. तेव्हां दादा म्हणाला-
 "तूं आज कांहीं वर्तमान पत्रे वाचलीं नाहींस वाटतें ? ' नवा काळ' ' केसरी, ' ' लोकमान्य, 'क्रॉनिकल, टाइम्स, " व्हाईस, ' कांहींच पाहिलें नाहींस का ? " मुंबईतल्या बन्याच गिरण्या संप करताहेत ना ? सगळ्या वर्तमानपत्रांतून आलें आहे हें ! " दादा सांगू लागला.” आज पांच वाजतां परळला चारपांच गिरण्यांतल्या मजुरांची सभा होती. मी तिकडे सभेला गेलो होतों ! कदाचित् एकदोन आठवड्यांत आमच्याही गिरणींत संप पुकारला जाईल नव्हे जाणारच ! " दादानें शांतपणानें, सावकाशीनें आणि खरोखरच गंभीरपणानें सांगितलें. या वेळच्या त्याच्या गंभीरपणाचा माझ्या मनावर खरोखरीच विलक्षण परिणाम झाला !
 अगबाई, म्हणजे ? संप होणार ? कशासाठीं पण तो ? " मी उतावीळपणाने विचारलें.