पान:मजूर.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ९ वें.

८५


 “असेल - दादा यापेक्षां तूं जास्त या बाबतींत बोलूं नयेस हेंच बरें ! समजलें तुझें बहिणीवरचें प्रेम ! तूं आपल्या फायद्यासाठीं बहिणीचा बळी द्यायला तयार झालास ?--आई, पहा बरें दादा किती दुष्ट झाला आहे तो ? " माझ्याच्यानें यापेक्षां कठोर बोलवेना. माझ्या डोळ्यांतून पाण्याच्या घारा लागल्या, जेवता जेवतां ताडकन मी उठलें-- पण इतक्यांत दादानें माझा हात धरला, आणि म्हटलें-
 "अरेरेरे! ताई, 'गंगा सिधु सरस्वतीच यमुना--गोदावरी नर्मदा'-- किती नद्यांना पाचारण केलेंस हैं ? खुळी कुठली ! तुला जसें कांहीं खरेंच वाटलें ! तुझ्यासारख्या हिरकणीला त्या मंकब्रॅिंडच्या हवाली करीन काय मी कधीं स्वप्नांत तरी ?
 बैस. पानांत टाकून, उपाशी काय उठतेस ? पानांत टाकून उपाशी उठायला अजून आपल्याला तशी कांहीं माजुरी श्रीमंती आलेली नाहीं !" दादाच्या या बोलण्यानें, माझा राग, रडूं चटकर नाहींस झालें, इतकेंच नव्हे तर उलट हंसूं आलें !
 "हें रे काय दादा ? भलतीच कशी थट्टा करतोस? माझ्याकडून उगी- चच दुष्ट खट्याळ म्हणून घेतलेंस कीं नाहीं ? "
 "चालायचेच ! पाहिलें आपलें तुझा तुझ्या दादावर विश्वास किती आहे तो! समजला. दुष्ट खट्याळ मला म्हटलें तेव्हांच तुझा विश्वास कळला ! "
 खरें सांग दादा, खुशालचंदानें खरीच तुझ्याजवळ माझी मागणी घातली १ "
 न घालायला काय झालें ? त्या दिवशीं तुला शेटजींच्या बंगल्या- वर भाईशी गप्पा गोष्टी बोलतांना पाहिले. त्यावेळेपासून त्याला वाटा- यला लागलें आहे कीं, तूं त्या भाईच्याच गळ्यांत विवाह माळा घालणार आहेस आणि – "
 "इश्श ! " दादा, आतां तिसरीचकडे वाहवला ! मला अगदींच चमत्कारिक झालें. मी तो विषय बदलून त्याला विचारूं लागलें. मग तूं त्याला शेवटचें काय उत्तर दिलेंस ? — निकाल काय लावलास १-