पान:मजूर.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ मजूर “ तेंच अगोदर सांगतों ! " दादा खरेंच धीरेधीरे बोलू लागला. " ताई, तुला आमच्या खुशालचंद मॅनेजरनें पसंत केली आहे !" " हें तर फार जुनें पुराणें झालें आहे !" मी म्हटलें ! " बरें मग ? " " त्यानें तुला माझ्याजवळ मागणी घातली आहे !" " हेंहीं तूं मागें पुष्कळदां मला सांगितले आहेस !" " नाहीं पण त्याने माझ्यावर त्या बाबतीत निकराचाच हल्ला चढ- विला आहे ! मी कबूल केलें - " 66 काय तूं कबूल केलेंस १ " मी एकदम चपापून विचारलें. 'नव्हे ग. मी जर कबूल केलं-" दादा सांगू लागला. 66 66 तर काय होणार आहे ? -" मी तिरस्काराने दादाला प्रश्न केला. “ माझें बरेंच कल्याण होण्याचा संभव आहे !" 66 मग काय ठरविले आहेस तूं ? " माझें डोकें गरगर फिरायला लागले. दादाला काय विचारायचें, काय बोलायचें हेंही मला सुचेना. तोंडांतला घांस-तोंडांतच फिरायला लागला. 66 तूं काय मॅनेजरला सांगितले आहेस ?" " मी सांगितले आहे की, ताईकडून कबूल करवितों !-ज्यांत माझें आणि तुझें कल्याण आहे, तें कबुल करायला ताई मागे घ्यायची नाहीं !” दादा उद्गारला. 66 तर रे बाबा !” "म्हणजे माझ्या आणि तुझ्या हिताची गोष्ट करायला तयार होणार नाहींस ? नाहींच व्हायचीस तूं तूं तयार होणार नाहींस, ती तुला तयार कशी करावी या विचारांत असतांनाच मी त्या वेळीं उदास झालों होतों समजलीस. " दादा निर्विकार चित्तानें म्हणाला. " म्हणजे तूं त्या मॅनेजरला मला देऊन टाकणारच वाटतं ? " मी अगदर्दी संतापून विचारलें. "" 'काय हरकत आहे ? असें काय त्याच्यांत वैगुण्य आहे ? आपल्या सारख्या स्थितीतल्या माणसाला स्थळ मिळायचें म्हणजे नशीब पाहिजे! एवढ्या मोठ्या गिरणीचा मॅनेजर आहे- "