पान:मजूर.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ९ वें.

८३

 " हो, ते सांगायचे आहेच नहीं का अजून १ पण त्याच्या करितां पहिल्या सारखा मला पुन्हां गंभीरपणा आणला पाहिजे. कारण गंभीर- पणा आल्याशिवाय गंभीर गोष्ट सांगतां येत नाहीं. तेवढ्या करितां तर जिना चढतांना राखून आणलेला गंभीरपणा मुद्दाम धारण केला होता. त्याच वेळेला त्याच गंभीरपणाने सांगणार होतों. पण आईनं सगळं तें आमचें फिसकटविलें. तिने माझ्या गंभीरपणाचा भलताच अर्थ घेतला. मग काय करणार ? त्यावेळेला त्याचा त्याग करावा लागला ! हं ! आतां चारदोन मिनिटे थांब! पुन्हां आतां त्या गंभीरपणाला आमंत्रण करितो आणि मग तुला आजची हकीकत सांगतों-"
 हे सांगून दादा खांकरून खोकरून गप्प बसायला लागला. मला जास्त हंसू यायला लागलें. मी हंसत होतें. मिनीट दीड मिनीट स्वस्थ राहून पुन्हां मला दादानें बजावलें, “हं, त ई, हें नाहीं उपयोगाचें बरें का ? तूं अशी हंसत राहिलीस तर मला गंभीर लवकर होतां येणार नाहीं. आणि अर्थात् कांडा सागतां येणार नाहीं ! – रत्नु, झालें जेवायचें. मग असा टिवल्याबावल्या काय करतो आहेस ? जेवायचें झालें असले, तर हात धुवून आईच्या पाठीशीं जाऊन पड ! का तुला आमच्या गंभीर गोष्टी ऐकायच्या आहेत ? पण तुला त्या कळणार कशा? नाहीं कळल्या तरी ऐकून ठेव. ऐकायची संवय अ दे तुझ्या कानाला ! पुढे त्या संवयीचा उपयोग होईल ! बाकी, आईच्या पाठीशी पडल्यापडल्या ऐकलेंस तरी चालेल. "   रत्नुचे जेवण झालेच होतें. तो हात धुवून दादाच्या सांगण्याप्रमाणें आईजवळ जाऊन निजला. आम्हां दोघाचें जेवण रमतगमतच चाललें होतें. थोडावेळ जाऊं दिला नी मी दादाला हंसतच विचारलें " झालास का गंभीर ? "
 "Oh 1" yes दादा हंसतच उत्तरला. तुला आजची हकीगत सांगायची नाहीं का ? "
 "उशीर का झाला हें सांगणार ? का उदास कां होतास हें सांगा णार अगोदर ? "