पान:मजूर.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
मजूर


तरास त्याला, तसें त्याला अंथरूण नाहीं का टाकून द्यायचे ? दिवसें दिवस ताई, तूं हीच होत चाललीस बघ ! — "
 वाः दादा ! आपण बाहेरून यायला उशीर केल्याचा अपराध- अ रीतीनं आमच्यावरच लादतो आहेस वाटतें ? वाः छान ! आम्हीं जेऊन - तू आल्याशिवाय बसलो आहोंत वाटतें ? रत्नसुद्धां अजून जेवला नाहीं. दादाबरोबर जेवणार म्हणून हटून बसला आहे तसा पेंगतो आहे. पण जेवना की जागेवरून हलेना सुद्धां ! - रत्तू जेवला नाहीं तुझ्या शि- वाय ती मी जीन का ? " मी किंचित् कठोरपणानेंच म्हटलें !
 "असें ? मग आहांतर तशीं शहाणीं मुलें तुह्मी ! मी उगाच का म्हणतों ?-बरें, चल घे वाढून, दे, पाणी दे पाय धुवायला ! - आई, तूंतरी खाल्लंसना ? का तूही माझीच वाट पहात बसलीस ? अजारी माणसाला तो नियम लागू नाहीं बरें का ? " असे म्हणत दादा उठला. पाय धुतले. मी तितक्यांत पाटपाणी करून झटपट आम्हां सगळ्यांचें वाढून घेतलें. जेवण होईपर्यंत लागणाऱ्या सगळ्या जिन्नस । मध्ये आणून ठेवल्या. आणि सगळे एकदमच जेवायला बसलो. रत्नुच्या डोळ्याला पाणी लावलें तो जेवायला बसला. त्यानें पण दादाला विचारलें कीं, " आज दररोजच्या सारखा लवकर कां आला नाहींस ? नवी ताई मोटार घेऊन आली होती. आज आम्ही तुला मोटारींतून फिरायला नेणार होतों. पण तूं आलाच नाहीं ! मग ताई जाईना मलाही नेलं नाहीं ताईने ! अशी झाली दादा गम्मत !”
 अशा रीतीनें आमचें जेवण हंसत खेळत खेळीमेळीने सुरू झालें. आम्ही पुष्कळदां असं जेवायला बसत असूं. त्यांत दादाला असा एखादे वेळीं यायला उशीर झाला त्याच्या ऑफिसाला सुट्टी असली, म्हणजे नेहमी आमचें त्यावेळी असेंच जेवण होई.
 दादाची उदासवृत्ति मावळली. त्याची स्वाभाविक वृत्ती खुलली. मग मी जेवतांना हलकेच विचारलें. " तें सगळे झाले. पण दादा, तुला यायला आज उशीर कां लागला ? आलास त्यावेळीं अगदीं उदास कां होतास? तूं सांगितलें नाहींस? का विचारल्याशिवाय सांगायचें नाहीं, असें कांहीं ठरविलें आहेस कीं काय ?