पान:मजूर.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ९ वे.

८१


 दादाचा नूर आज बदलेला दिसत होता. रोजच्याप्रमाणें जिन्यांतल्या पावलांचा दादाचा आवाज, आणि " ताई-रत्नु " अशा मला नी रत्नुला हाका मारण्याचा आवाज एकाच वेळी यायचा ! मला पाहातांच दादा हंसला नाहीं, कांहीं तरी थट्टा विनोदाचा नवीन मासला मला ऐक विला नाहीं, किंवा पुढे गेलल्या रत्नुचे गालगुच्चे. आणि मुके घेऊन त्याची संभावना केली नाहीं, असें कधीं सहसा होत नसे ! पण आजचा रंग कांहीं वेगळाच होता. दादानें आज आईला सुद्धां हांक मारली नाहीं. की, तिच्या प्रकृतीची चौकशी केली नाहीं.
 'संतूबाळ आलास का ? - "आईनेच अखेर विचारलें.  "हो आत्तांच ! " दादाने तुटक उत्तर दिलें.  उशीर झाला फार ! "  "होय ! " पुन्हांही तुटकच उत्तर आलें.  संतुबाळ, आज असा कां बोलतो आहेस ! जितक्यास तितकेंच उत्तर देतो आहेस. सचिंत झाला आहेस !-हें रे काय ? प्रकृती कां तुझी ठीक नाहीं ? " आईनें घाबरून जाऊन विचारलें, दादाच्या आजच्या वर्तनानें मी पण घाबरून गेलें होतें.
 "तसें कांहीं नाहीं आई ! माझी प्रकृति चांगलीच आहे ! " आईच्या आवाजांतली कातरता " प्रकृती का तुझी ठीक नाहीं, ? " या वाक्याच्या वेळीं दादाच्या एकदम लक्षांत आली. आणि त्यानें झटकन् उत्तर दिलें. इत• केंच नाहीं, तर त्यानें आपली धारण केलेली म्हणा, नाहींतर आपोआप आलेली गंभीरवृत्तीने झटकन् बदलून टाकली. आणि चेहरा प्रफुल्लित केला. आळसटप- जानें सतरंजीवर पडला होता, तो ताडकन उठला आणि मलाच म्हणायला लागला, "ताई, अजून नाहींना मला पाय धुवायला पाणी ठेवलेंस ? अन् मला जेवायचें आहे! मी उशीरां आलों म्हणून काय बाहेरूनच कुठून च्याब्या मारून आलो? अशी तुझी कल्पना झाली की काय ! तूं जेऊन घेतलयस वाटतें ! म्हणूनच अशी शांत आहेस !- आई, तूं कांहीं खाल्लेंस का ? आज कांहीं अंगांत तापविप नव्हता ना ?-अन रत्तू निजला वाटतें ? ताई, तो रत्नु तिथे तसाच पेंगत बसला आहे, जेवायला घात-
  म...६