पान:मजूर.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ८ वै.

७७


फार वेळ टिकली नाहीं. बबूताई हंसत हंसत जाग्यावरून उठली, दादा- जवळ गेली, व त्याला म्हणाली, संतदादा, झालं तुमचं बोलून ? कां आणखी कांहीं आहे ?असेल तर बोलून घ्या. ( बबूताई माझ्याकडे वळून. ) ताई, बैस ग तूं ! तूं का उभी आहेस ? संनूदादा, इथें नोकर धन्याचा काय संबंध ? शिवाय सुगंधाताई कुणाची नोकर आहे ? आणि तूं नोकर असलास तरी कुणाचा ? गिरणीचा ! इथे काय त्याचें ! तूं आमच्याकडे कधी येणार नव्हतास तो आला आहेस. ताई तिथे माझ्याजवळच बसा - यची ! ती माझी बहीण आहे ! तसेंच तुम्हीं पण आमच्या भाईजवळ जाऊन अगदीं भावाच्या नात्यानें बसले पाहिजे ! भाई, संतूदादा माझे म्हणजे तुझे सुद्धां भाऊ आहेत ना ? मग इथे त्यांनी तुझ्याजवळ नको का बसायला ?–बस दादा तिथे बसलेच पाहिजे ! - " बबूताईनें सतू- दादाच्या हाताला धरून भाई ज्या कोचावर बसला होता तेथे नेलें. भाईही उठला. त्यानें संतूदादाचा हात धरून म्हटलें, " संतुराम, आमची बबूताई म्हणतें तेंच खरें आहे. तुम्हीं आम्हीं भाऊच आहोंत. माझ्याजवळ बसायला तुम्हांला कांहींच हरकत नाहीं ! तुम्हीं आमचे मजूर असला, तर मीही तुमचा मजूरच आहे ! या नात्यानें आपण सार- खेच नाहीं काय ? " असें म्हणून दादाला आपल्याजवळ नेऊन बसविलेंही !
 बसा हो खुशालचंद ! बसा असे !" भाईनें मॅनेजर खुशालचंदा- लाही बसावयाला सांगितलें. पण ते बसले नाहींत. प्रस्तुत प्रसंगाचा त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला असला पाहिजे. बाह्यतः ते जरी शांत होते, तरी तोंड काळे ठिक्कर पडलें होतें. इतरांना कदाचित् तसें दिसलें नसेल, लक्षांत आलें नसेल, पण मला मॅनेजरांचा चेहरा त्यावेळी फारच भेसूर, विद्रूप, क्रुद्ध, त्वेषयुक्त असा दिसला !
 "छोटे शेट, " मॅनेजर न बसतांच बोलत होते, " शेटजी कुठें आहेत ? मी त्यांच्याकडे कांहीं महत्वाच्या कामाकरितां आलों होतों."
 "बाहेर गेले आहेत. बाहेर जातांना त्यांनी तुम्हांला टेलिफोन दिला होता ! तुम्हीं ऑफिसांत हजर नव्हता १-"