पान:मजूर.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
मजूर


 "तर काय बहार होईल म्हणावें ! " भाईच बोलला ! यावर आम्हीं सर्वच हंसलों ! आमच्या सर्वोच्या एकदम हंसण्यानें सर्व दिवाणखाना दुमदुमून गेला ! - आमच्या हास्यानें जो छत तयार झाला होता, तो वितळण्याच्या आंत त्या दिवाणखान्यांत अकस्मात् व अकल्पित दोन व्यक्ति आल्या !
 एक मॅनेजर खुशालचंद, व दुसरा आमचा संतूदादा ! ते दोघेही आमच्याकडे व आम्हींही त्यांच्याकडे अर्धघटकापर्यंत नुसते ' आ ! ' करून पहात होतों !
 अरे, सुगंधाताई, बबूताई, दोघीही इथे कुठे ? – ” संतुदादानें आम्हां दोघींना एकदम पाहून आश्चर्याने विचारलें !
 "इथें कुठे म्हणजे ? संतुदादा, मी आमच्याच बंगल्यांत आहे ! मी दररोज नाहीं का सुगंधाताईला माझ्याकडे आणीत ? – रत्नुही आला आहे ! तिकडे बाबांच्याकडे आहे !-भाई, हाच संतुदादा बरें का ! सुगं- धाताईचा, माझा, आणि म्हणून तुझाही भाऊच ! "
 "म्हणजे हा तुझा बंगला ? हा तर आमच्या गिरणीच्या मालकाचा ईच्छा रामशेटजींचा बंगला ! म्हणजे तूं ईच्छारामशेटजींची मुलगी तर ? ताई, सुगंधाताई, ऊठ ऊठ तिथनं ? कुठे बसली आहेस तूं ! आपल्या मालकाच्या, धन्याच्या गादीवर त्यांच्या बरोबरीने बसतेस ? ऊठ ! पिंडीला पाय लावू नये ! आपल्या स्वामीच्या बरोबरीनें बसूं नये ? स्वामी सेवकांचें नातें विसरूं नये ! - मॅनेजरसाहेब, हे आपले छोटे शेट ना ? ( दादाने त्यांना जमीनीला पडून साष्टांग नमस्कार घातला ! ) छोटे शेट, माझा - आपल्या गिरणींतल्या गरीब मजुराचा हा आपल्याला प्रेमाचा दंडवत आहे ! आमच्या ताईला कांहीं कळत नाहीं ! अडाणी आहे ती ! म्हणून तिच्या हातून आपल्या बरोबर बसण्याचा अपराध झाला आहे ! एकवार तिला माफ करा ! पुन्हां ती असें करणार नाहीं ! मी तिला करूं देणार नाहीं ! " दादा हें बोलतांना गोंधळून जाऊन मी खरीच उभी राहिलें होतें !
 संतदादा बोलायचे थांबल्यावर दोन तीन मिनिटे अगदीं शांत होतें. माझें तर मस्तक अगदीं बधीर होऊन गेलें होतें ! पण ती शांतता