पान:मजूर.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ८ वें.

७५


लळा विलक्षण लागला होता ! रत्तूला बरोबर घेतला आणि आम्ही गेलों !
 बंगल्यावर चहापाणी, फराळाचें झालेच. भाई आमच्यांत गप्पागोष्टी करायला मिसळला. माझ्या नव्या जुन्या लेखनाची चौकशी, आईच्या प्रकृतीची पूसतपास झाली. रत्नु आमच्यांत कशाला बसतो आहे ? मोटारींतून उतरतांच त्याने थेट बबूताईच्या वडिलांना गांठलें होतें. दोघांचें बरें जमत असे ! शेटजी मोठें नवकोट असले तरी रत्नुला त्याची काय कल्पना ? तो म्हातान्याच्या अंगाखांद्यावर खुशाल तेथें असेपर्यंत खेळे लोळे ! शेटजींनीही हा मजुराचा दरिद्र्याचा मुलगा म्हणून कधींही तिर स्कार केला नाहीं! मुलाच्या मनानें मुलाशीं खेळण्यांत म्हातारा तासचे तास रंगून जाई ! असो. रत्नु या वेळीं तिकडे होता!
 सुगंधाताई, त्या दिवशींच्या मूच्छितपणाची हकीकत अगर्दी जशीच्या तश्शी लिहिली आहेस ! मला फार आवडली ! तूं लिहिलेले वाचतांना मला वाटलें तो प्रत्यक्ष प्रसंग पुन्हां आतांच जसा कांहीं घडतो आहे !. तसाच मॅनेजरच्या भेटीचा प्रसंग ! वाचतांना खूपच खूप हंसूं येतें ! विनोदीसुद्धां तूं चांगलेच लिहितेंस कीं ! " भाईची ही भाषा होती ! - " कसले विनोदी लिहिते आहे ही ! - " बबूताईनें मध्येच तोंड घातलें ! भाई, तूं संतूदादाला पाहिलें नाहींस ! संतूदादाच्या विनोदी बोल- ण्यांतला एकशतांश तरी हिच्या लिहिण्यांत आहे का ? काय ग ताई ? मी म्हणतें तें खोटें आहे का ?
 "अगदी खरे आहे !" मी म्हणाले " भाईना माझी स्तुति करायची संवयच झाली आहे झालें!
 "काय सुगंधाताई ! मला र्जे वाटलें तें सांगितलें तर स्तुति केली वाटतें ? - बरें तर, तूं आतां कांहीं लिहिलेलें बबूताईनें वाचायला तर आणूं दे- मी नुसत्या चुकांचा ताईपुढे व तुझ्यापुढे असा ढीग रचून ठेवतों पहा ! सुगंधाताईनें तयार केलेले शब्दचित्र तुमच्यापुढे अगदीं उलटें धरतों म्हणजे झालें ! मग काय ? ताईच्या शब्दचित्रांत तुम्हांला आणि मला नखशिखांत चुकाच चुका दिसतील !-"
 "वा ! भाई ! तुमच्या या विनोदी बोलण्याइतका जर मला विनोद लिहितां येईल–”