पान:मजूर.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
मजूर


यची ! दादावरच रागावयाची ! शेवटीं हटून, रुसून जेव्हां चांगलें म्हणवून घेई, तेव्हां तिला बरें वाटे! दादाकडून मला दादाही जसें मला एकदां वाईट तर खूप वाईट म्हणायला लागायचा! तसेच चांगले म्हणा- यला लागला, म्हणजे बेसुमार चांगलें म्हणायला लागायचा ! मग जगां- तले असतील नसतील तितके गुण माझ्यावर लादायचा ! एकदां दादानें माझी स्तुति चालविली म्हणजे मग काय? मेरीकॉरेली काय? - भगिनी निवेदिता काय ? तरुलतादत्त काय ? किंवा जगांतल्या या सगळ्या ग्रंथकर्त्या किंवा ग्रंथ- कर्ते जणूं काय माझ्यापुढे शरणांगतासारखे पुढे हात जोडून उभे आहेत असें बबूताईला भासवी ! या उलटसुलट बोलण्याचें बबूताईला अगदीं विल- क्षण-वाटे ! दादाच्या बोलण्याकडे ती आपले सर्व लक्ष लावी ! दादानें असें विलक्षण-गंमतीचे बोलत रहावें म्हणून प्रत्येक बबूताईच्या व दादाच्या भेटीत बबूताई नाना युक्तथा योजी ! दादा हें ओळखी. व बबूताईच्या ह्या कल्पनेची पूर्ती, खरोखरच अनंत चमत्कारपूर्ण नवलकथा - सांगून करी.
 आतांशा आतांशा बबूताईच्या आणि माझ्या भेटीत जितका काळ जाई, त्यांत बहुतेक माझी, माझ्या लेखांची, तिच्या भाईनें केलेली अवा- स्तव स्तुति, आणि दादाचें, त्याच्या स्वभावाचें, त्याच्या बोलण्याचें, कोट्यांचें, मनसोक्त वर्णन, याचाच भाग जास्ती असावयाचा असो !
 अशी आमच्या आयुष्यक्रमाला सुरवात झाली होती. असे चाललें असतां, एक दिवस सहज एक गमतीची गोष्ट घडली ! त्या गोष्टीनें मला आणखी कांहीं नव्या गोष्टी कळल्या. कित्येक गोष्टींचें अधिकच गूढ पडलें ! कित्येक गोष्टींबद्दल नुसतीच चिंतेची छटा उठली. ती गोष्ट म्हणजे अशी:-
 त्या दिवशी आम्ही दोघी, मी व बबूताई शाळेंतून बरोबर आलों. आईची प्रकृती साधारणच होती. झेपेल तसें व होईल तसें स्वत: च्या मनाच्या करमणुकीसाठी, व समाधानासाठीं कसली तरी पोथी आई वाचीत असे. आम्हीं शाळेतून आलों. आईनें फोडणीचे पोहे बसल्या बसल्या करून ठेवले होते. ते घ्यायला सांगितले. ते आम्ही दोघींनीं खाल्ले ! आणि आईला विचारून मी बनूताईच्या बरोबर तिच्या बंगल्यावर जायला निघालें ! रत्नु बरोबर यायचाच ! बबूताईच्या वडिलांना- कां कोण जाणें - रत्तूचा