पान:मजूर.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ८ वें.

७३


च्याशीं स्नेह जोडण्यांत आम्हांला जसें भूषण वाटतें, तसेंच आमच्या स्नेहांबद्दल श्रीमंतांनाही धन्यताच वाटली पाहिजे, तरच स्नेहाचें सार्थक ! एरव्ही कसला आहे स्नेह ? निव्वळ परस्परांची फसवणूक ती ! - आपल्या आयुष्यांत अजून काय चमत्कार झाले आहेत ? असे चमत्कार घडून येणार आहेत ! आज जें स्थित्यंतर घडते आहे, त्यावरून पुढें अजब चमत्कार घडणार आहेत, एवढीच आपल्या मनाशीं खूणगांठ आपण बांधावयाची असते !' असें दादा पुष्कळदां प्रतिपादन करी !
 आमच्या चमत्कारयुगाला सुरवात झाल्यापासून दादाच्या मनाची स्थिति काय झाली होती कोण जाणें. पण माझ्या मनाचें मात्र विलक्षण स्थित्यंतर झालें होतें. आमच्या दिवसाच्या वर्तनक्रमांत ज्या ज्या गोष्टी `घडत, त्या सगळ्याच मला नवलपरिच्या वाटत; मी त्या रात्रीं लिहून ठेवूं लागलें. आज असें झालें, बबूताईची गांठ पडली, त्यांची माझी अमूकतमूक बोलणी झाली; दादाला हें सांगितलें; दादानें ऑफिलांतली - मजा सांगितली. मॅनेजरनें असा चावटपणा केला, त्याची तशी आम्हीं खोड काढली ! एकना दोन- सगळे सगळे होईल तें लिहून ठेवी. दादाला दाखवीं; बबूताई आपण वाचून पुन्हां भाईला दाखवायला नेई. -बबूताईच्या सांगण्यावरून आतांशा मी लिहिलेले वाचण्याशिवाय, आणि त्याची मनमुराद स्तुति करण्याशिवाय भाईला दुसरा विषयच नव्हता ! माझ्या लिहिलेल्या लेखावर दादाची आणि बबूताईची गांठ पडली म्हणजे तासच्या तास वादविवाद होई ! चांगली खडाजंगी उडे ! बबूताईनें माझी बाजू घ्यावी. दादानें मुद्दाम तिच्या उलट बोलावें. " सुगंधाताईला काय कळतंय ? काय येतय ? लेखिका व्हायचं म्हणतांच कांहीं होता येत नसतं ! त्याच्या करितां आयुष्याच्या आयुष्य वेचावें लागतें ! तपेंच्या तपें घालावी लागतात ! बबूताई, तुम्हीं सुगंधाताईला उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवू नका ! नाहींतर ती शेफारून जाऊन कायमचीच कुचकामाची होईल ! अहो, आम्हीं हमालखान्यांत बारानू बारा चोवीस तास हाडांचीं कार्डे करतों, तर आम्हांला धड पोटभर खायला देत नाहींत, कीं, 'अरे चे अहो' म्हणत नाहींत. तर लेखक व्हायचें काय तोंडाचें लागलें आहे ? ” असें दादानें म्हटलें कीं बबूताई चिडायची, वैतागा-