पान:मजूर.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ८ वें.

७१

हजारो गरीब बायाबापड्या कामकरी - बायकांना तो आपल्या गोपी समजे ! जणुं काय निर्लज्जपणा, पाजीपणा, खुशालचंदाच्या पांचवीला पुजला होता ! खुशालचंदाने, दारूच्या नादांत, व्यसनाच्या - बाहेरख्यालीपणाच्या नादांत आपल्या पहिल्या तीन बायकांना छळून छळून हालहाल करून, निजधामाला पाठविलें होतें. या सान्या गोष्टी दादाला माहित झाल्या होत्या ! त्याच्याशी लगट करण्याची, दादाची तयारी नव्हती ! त्याला आपले घर दाखवायचें म्हणजे आपल्या घरच्या पावित्र्याला बाहेर लोटा- वयाचें, पापाला घरी बोलावून आणून त्याचें स्वागत करावयाचें, असेंच दादा समजत असे ! त्याच्या हाताखाली दादा वागला होता, वागत होता; म्हणून आपली मर्यादा संभाळून शक्य तितकें दादा नेहमी त्याच्याशी वागत असे ! त्याचा हा स्वभाव असा असला तरी कामाला राक्षसासारखा होता. त्याची कामाची उरकशक्ति अतीशय दांडगी होती. त्याची कामाची शिस्त आणि धोरण ही विलक्षण होतीं ! याच त्याच्या अंगच्या गुणावर आज कित्येक वर्षे गिरणीचा मॅनेजर म्हणून गाजत होता. आणि त्याच्या याच गुणाने गिरणीला उर्जीतावस्था आली होती ! मालकाचा नफा सालीना कोटींनीं वाढविला होता ! दादा हे त्याचे गुणही कबूल करी. पण तेवढ्या करितां त्यांच्याशी संबंध यावा हें दादाला कधींच पटलें नाहीं ! खुशालचंद आमच्या घरीं आला तर दादाची तळ- पायाची आग मस्तकाला जात असे ! तरी पण अलिकडे सुट्टीच्या दिवश आमच्याकडे येण्याचा त्याने परिपाठ ठेवलाच होता ! यायचें, आईची विचारपूस करायची, अचावचा कांहीं तरी बोलायचं, दादाला, मला, गाडींतून फिरायला चलायचा निलाजरेपणानें आग्रह करायचा, हें त्यानें चालविलेंच होतें ! अशी खुशालचंदाची आमच्या विषय हकीकत होती !
 तर इकडे बबूताईच्या बाबतीत तर उत्तरोत्तर भेदभाव लोपत चालला होता ! भाई भेटत असे, आमच्या घरींही बबूताई बरोबर वरचेवर यायला जायला लागला होता ! बबुताईचे वडिलही मला ओळखायला लागले होते ! एकदोन दिवस मी बबुताईकडे गेलें नाहीं, तर तिचे वडील तिच्या- जवळ चौकशी करीत कीं, " तुझी ती मैत्रिण कां आली नाहीं ! तिचा छोटा भाऊ तर मोठा चलाख आहे ! जा त्यांना घेऊन ये जा !" आतांपर्यंत