पान:मजूर.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ८ वें.


कादंबरीतल्यासारखे योग !


 आमच्या आयुष्यांतल्या चमत्कार युगालासुरुवात झाली होती असें म्हणायला कांहीं हरकत नाहीं ! आईच्या जास्त आजाराच्या दिवशीं, व त्याच्या दुसऱ्याच दिवशीं ज्या निरनिराळ्या, एका मागून एक अनेक अशा, आमच्या नित्य क्रमाला पुष्कळशा विसंगत गोष्टी घडल्या, त्या आमच्या चमत्कार युगाला सुरुवात करण्यासारख्याच होत्या तर काय ? त्या दिवसापर्यंत ध्यानी मनीं नसतां आईच्या आजाराच्या निमित्ताने मला बाहेर पडावें काय लागलें, वाटेंत मूच्छी काय आली, भाईची मोटार त्याच वेळी तिथे कां आली ? पुढे त्यानें माझ्याकरितां इतकें श्रमसायास- सहाय्य कां केलें ? आपल्या मोटारीतून गिरणीला कां पोंचविलें ? गिर- णीच्या मॅनेजरचा जणुं काय मनुष्याचा मासलाच म्हणून की काय, तो एक फार्स काय उडाला ? घरीं येऊन पाहतें, तो शाळेतली श्रीमंताची मैत्रिण कधींच नाहीं, ती काय बुद्धि होऊन आमच्या घरीं आलेली दिसली ! तिनें आईची सेवासुश्रुषा इतक्या मनोभावानें केली ती कां ? माझ्यावर, माझ्या दरिद्यी छोट्या कुटुंबावर अकृत्रिम मायेचा वर्षाव करा. वयाला सुरवात केली ती कशासाठी ? चमत्कारयुगाशिवाय हें असें संभ- वनीला कसें होईल ?
 याच विचारांत माझें मन परिभ्रमण करूं लागलें होतें, चमत्कार युगाला सुरवात होऊन आतां चांगले तीन आठवडे लोटले होते; त्या दिवसापासून नित्य नवें कांहीं तरी घडतच होतें. मॅनेजरने म्हटल्याप्रमाणें संतुदादाला त्या दिवशींच्या त्या दिवशींच मोकदमीवरून काढून वर ऑफिसांत महत्वाच्या जागी आपल्या अधिकारांत नेमणूक करून दिली होती. रोजमुऱ्यांतही कांहींशी वाढ केली होती. त्या दिवसापासून आमचें बबूताईकडे, बबूताईचे आमच्याकडे सारखें येणें जाणें वाढतच चाललें होतें. गेल्या महिन्यांतली मजुरीच्या मोलाचीं माणसें आम्हीं या महिन्यांत दररोज