पान:मजूर.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निरक्षर, शेतकरी वर्गास शेतकी सोडून जावे लागणें हेंच त्यांस कसें जिवंत मरण असतें, तेंच तो वर्ग आपल्या 'शेती'वर कसा शोभतो, जगतो, वैभवांत राहतो, व दुसन्यासही वैभवांत ठेवण्याला समर्थ होतो, याचें सुंदर शब्द • चित्र प्रत्येक सहृदय वाचकांस प्रसंगानुसार, हंसवील, रडवील, विचार करायला लावील; व गोड़ मित्राप्रमाणें उन्नतीचा उपदेशही करील ! या पुष्पाचा वास तामसी उन्मादक नसून उद्बोधकतेचा उल्हास प्रतीत करणारा आमोददायी असल्याबद्दल वाचकांची खात्री पटेल. ]

पुष्प तिसरें.
शिपाई "
लेखक - बाबाग्रज.

 [ 'ठोशास ठोसा द्यावयाचा, ठोशास बोसा ( गाल ) द्यावयाचा नाहीं, हें महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यकालीं असलेच पाहिजे. आज मात्र तसें नाहीं. आज महाराष्ट्र आपला जातिवंत " शियाई " बाणा विसरला असावा असें ह्मणण्यास पुष्कळ आधार सांपडतात. कारणें कांहींही असतील. तसेंच सामर्थ्य असून शांत राहणें हें निराळें, व सामर्थ्य नसल्यामुळे एका श्रीमुखांत भडकविली असतां, भीतीनें दुसरा गाल पुढे करणें वेगळें. महाराष्ट्रांत सध्या पूर्वोक्त प्रकार कमी दिसत असून उत्तरोक्तच अधिक अनुभवास येत आहे. परंतु यामुळें साहजीकच या कमकुवत देह व मन याचा अनिष्ट परिणाम देहावर, मनावर, त्याचप्रमाणें घरावर, समाजावर होणें स्वाभाविक आहे, व तो टाळला, तर काय होईल; आपल्याला मग जग कसें दिसेल, आपण जगाला कसें दिसूं. याचा ठसठशीत ठसा याच कादंबरींत लेखकानें उठविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ]

पुष्प चवथें.
ले. - श्रीनिवास बी. ए.
"जीवन कलह."

 [ सामान्य मनुष्य परिस्थितीनें, धंद्याच्या, नौकरीच्या पाठीमागें लागल्यानंतर, त्याचे हालहाल कसे होतात. त्याच्या तारुण्यांतील सात्विक महत्वाकांक्षा कशा लय पावतात, व त्यामुळे कसें तरी जगण्या-