पान:मजूर.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

- ' मालेत ' जाहिराती घेण्याची व्यवस्था केली आहे. सबंध 'पेज' जाहिरात देणारांस प्रत्येक वेळीं १० रुपये, अर्धा पेज सहा रुपये, पड- तील. कायमच्या जाहिराती देणारांनी स्वतंत्र पत्र व्यवहार करावा.


महाराष्ट्र - कुटुंब - माला
पुष्प पहिले.
"मजूर."
लेखक -' माईसाहेब'कर्ते ना. वि. कुळकर्णी.

 [ या कादंबरीत कुलशीलवान्, शिक्षीत, पण गरीबीच्या परिस्थिती- मुळे एका तरुणाला मुंबईसारख्या ठिकाणी गिरणींतून ' मजूर' म्हणून राबावें लागतें, त्या नीच कोटींत, त्याचे, व त्याच्या आईचे, लहान भावंडांचे अतोनात हाल झाले, तरी त्या सर्वांना तोंड देऊन, कुलशील न सोडतां, सचोटीनें, ध्येयाला धरून, ईश्वराला स्मरून वागून, 66 प्याद्याचा फर्जी कसा होऊं शकतो, " याचें चटकदार चित्र या कादंबरीत वाचकांस वाचावयास मिळेल. ]

पुष्प दुसरें.
कसे दिवस जातील? "
लेखक - आनंदी तनय

 [ आपला महाराष्ट्र शेतकी प्रधान आहे. शेतकरी शेतवाडी सोडून पोटाच्या पाठीमागे लागून मुंबईसारख्या बकाली - अवाढव्य शहरांत • जातो. त्यामुळे त्याची, त्याच्या कुटुंबाची काय देना होते. स्वतः जगण्याचें, व कुटुंबाला जगविण्याचें खरें साधन, बकाली वस्तीत हमाली करण्याचें नसून,खेडेगांवातल्या स्वतःच्या शेतीवर राबण्यांचेच आहे. गरीब, अडाणी,