पान:मजूर.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें निजायबसायची- अभ्यासाची जागा- सगळें सगळे दाखविलें ! मग आम्ही दिवाणखान्याच्या पलिकडच्या दालनांत गेलों. एका उंची-सुन्दर मखमालीच्या मऊमऊ कोचावर आम्हांला बबूताईनें बसविलें. ती पण आमच्याजवळ बसली ! यावेळी बबूताईच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विलक्षण तेज चमकत होतें ! रत्नुला तिनें जवळ ओढून, त्याचा मुका घेऊन विचारलें, "रत्नु, कसा आहे बंगला !” 86 छान आहे " कुणाचा आहे हा ? तुमचा ! " “ आणि तुझा रे ! -" “आम्ही मोठे झाल्यावर बांधणार आहोत ! मग तुम्हीं याल आमच्या बंगल्यांत नव्याताई !” रत्नु उत्तरला ! या त्याच्या बोलण्याबदल बबू ताईनें त्याचे प्रेमभरानें पटापट कितीतरी मुके घेतले ! 66 १, 66 तुझे वडील कुठें दिसत नाहींत ते?" मी चौकशी केली. बाहेर गेले आहेत वाटतें ! नेहमीं नाहींत जात या वेळेला ! पण आजच गेले आहेत. 39 66 अन् तुझे विलायतेहून आलेले भाई ?” “ येईल आतां इतक्यांत !" बबूताई हैं सांगते आहे, तोंच चहा, फराळाचें, एका चांदीच्या ताटांत घेऊन तिचा एक नौकर आला. चांदीची तपेली, पंचपात्री - मी आपली बबूताईकडे आणि आणलेल्या फराळाच्या जिनसांकडे टकमक पहातच राहिलें ! 66 66 ' बबूताई, हें ग काय ? मला कुणी देवीबिवी समजून तर मला नैवेद्याचें हें आणलें नाहींस ! हे षोडशोपचार मला ग कशाला ? - माझ्या तिथें एवढ्या करितांच चहा करूं दिला नाहींस वाटतें ? -" “ तसें नाहीं कांहीं ताई ! तुझ्या करितां म्हणून मुद्दाम असें कांहींच नाहीं. आमचें हें रोजचेंच असतें !" बबूताई माझी समजूत करूं लागली. म...५