पान:मजूर.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" एवढ्या करितां नाहीं. ताई, मला हे जन्म आहे काय ? " मजूर मी थोरामोठ्याकडे जायला कधीं उत्सुक असत आवडत नाहीं बघ !-ताई, अशाकरितां आमचा आहे ! खास आहे ! नाहीं कशावरून ?-" ताईचा स्वर कातर झाला. रत्नु, फगळाकरितां, चहा घ्यायला उत्सुक झाला होता. पण माझी त्याला भीति वाटत होती. तो माझ्या मनाचा कल पहात होता ! ' हं, आटप ताई, चहा निऊन चाललाय !--तुला आणखी किती तरी गोष्टी दाखवायच्या आहेत. पलिकडे मी स्वतः छोटासा बाग तयार केला आहे, तो तुला दाखवायचा आहे !--" 66 भाई येताहेत ना ? –" मी प्रश्न केला. " आपले फराळाचें झाल्याशिवाय तो इथें यायचा नाहीं !- त्याच्या कडे आतां-तिकडे चहा-फराळच चालला आहे !" " मी हें घेतले म्हणजे तुला बरें वाटेल ? " “ हो !” अगर्दी नाइलाज होऊन, केवळ ताईच्या मर्जीकरितां मी तिथें फराळ केला. आमच्या इथें आम्हांला इतक्या तऱ्हेचें कर्धी करितां येत नाहीं. आईला, दादाला, रत्नुला धड चांगल्या तऱ्हेचें सात्वीक भरपूर अन्न मिळण्याची मारामार पडते. आमच्याकडून उलट असा परामर्ष दुस- ज्याचा घेण्यास आमच्यांत शक्ति नसते, त्या आम्हांला हें यथास्थित सेवन करण्याचा काय अधिकार ? हाच विचार ताईच्या प्रेमाच्या उपा- हाराकडे अशा त्रासदायक रीतीने पहावयाला लावीत होता ! जें आम्हांला दुसऱ्याला देतां येण्यासारखें नाहीं, ते दुसऱ्याकडून आम्हीं तरी कां घ्यावें ? ताईंनें तरी घेण्याकरितां कां आग्रह करावा ? श्रीमंती मोहांनीं ' आम्हांला कां सतवावें ? हचि विचार मालिका डोक्यांत चालूं होती. आमचा चहा झाला, जिन्यांत पावलें वाजलीं, ताई म्हणाली, “ भाई आला. " तोंच बबूताईचा भाई आम्ही बसलो होतो त्या दाल- नांत - आम्हांला–बबूताईच्या मैत्रिणीला पहावयाला आला. बबूताईच्या भाईला पाहतांच, "अगबाई ! हे ते —" असा अर्धस्फुट आश्रद्वार