पान:मजूर.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ मजूर खऱ्याखुऱ्या दयामायेची माणसे जगांत आहेत, म्हणूनच जग आहे ! ही समजूत ताई, तूं आज मला पटवून दिलीस ! — " " सुगंधाताई ! किती अवघड बोललीस ! इतकें अवघड मला बोलतां येत नाहीं, आणि समजतही नाहीं. तूं माझी मैत्रिण आहेस एवढे मला कळतें, नी मला तूं आपली मैत्रीण समजावेंस असे वाटतें !" बबूताई मोकळेपणाने बोलली ! चाललं - " ताई, तू माझी मैत्रिण आहेस - नी मी पण तुझी मैत्रिण आहे --- इतकेंच नव्हे तर आतां आपण सख्ख्या बहिणी आहोत ! ” " खरेंच आहे ! आपल्या दोघींची आई आहेच !" बबूताईचे पण डोळे आनंदाच्या पाण्यानें अर्से म्हणतांना भरून आले ! 66 इतक्यांत मोटार बबूताईच्या बंगल्याच्या पोर्चमध्यें येऊन उभी राहिली ! आम्हीं मोटारीतून उतरलो. रत्नुने माझा एक हात घरला, बबू- ताईचा एक हात धरला, आम्ही बंगल्यांत शिरलों. आंत शिरतांना माझी सहज वर नजर गेली- बंगल्याच्या पोर्चवर सुन्दर सोनेरी अक्षरांची इच्छारामभाई टेरिसिस " अशी मोठी थोरली पाटी लावलेली दिसली! बंगल्यांत शिरत असतांच मी मनाशी म्हटलें,' ,"इच्छारामभाई टेरिसिस !” म्हणजे दादा ज्या इच्छारामभाई-मिलमध्ये कामाला जातो, त्या गिर णीच्या मालकाचा हा बंगला की काय ?- मग बबूताई त्या मालकाची मुलगी !! आश्चर्यच म्हणायचें ! " हें मनांत आलें, पण मनांतल्या मनांतच करण्याकरितां: बब्रूताईला विचारण्याचें त्याच नाहीं, नी मी घाई पण केली नाहीं ! नवकोट नारायणाचाच बंगला तो ! आंत जातांक्षणी माझे तर डोळे दिपून गेले ! क्षणभर मी भांबावून गेलें ! रत्नुची तर त्रेधा तिरपीट विचारायलाच नको ! ' ताई हैं बघ ! ताई, ती पाहिलीस कां गम्मत ! ' असेच सारखेच त्याने सुरू केलें ! बबूताई आतां पुढें होती ! रत्नुनें तिचा हात सोडला होता. माझाच हात तेवढा धट्ट धरून ठेवला होता. प्रथम बबूताईनें सगळा बंगला फिरून दाखविला. दिवाणखाना, तिच्या वडिलांची बसायची जागा. भावाची बसायची-जागा. तिची स्वतःची ठेवले ! त्याचा उलगडा वेळीं मला धाडस झालें