पान:मजूर.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें त्याला विलक्षण वाटायला लागले. 'ताई, दादा घरी आल्यावर आपण नव्या ताईच्या मोटारींत बसलो होतो म्हणून सांगायचें बरें ताईची मोटार फारच छान आहे म्हणून! आईला सांगूं अं कां ? - नव्या ! — " 66 'बबूताई, " मी बबूताईला म्हणालें, " झाले तुझ्या मनासारखें. ? माझें काय जातें, करतेसच जर तूं आम्हाला श्रीमंत – तर मी ग कां नको म्हणूं ? बबूताई, खरें सांग हं पण, माझ्यावर तुझें प्रेम कां ग आहे?" 66 कुणास ठाऊक ताई ! तें मला दिखील कळत नाहीं ! पण आहे इतकें मात्र खरें ! आजपर्यंत मी असें प्रेम कधींच कुणावर केलें नाहीं, नी मला प्रेम करायला तुझ्यासारखी मैत्रिण पण मिळाली नाहीं ! " बबू- ताई अगदी मनोभावानें बोलली ! 66 पण मी गरीब आहे ! " “ धनानें कीं मनानें ? " “ धनानें ! - " “ मनानें नाहींस ना ? " " कोण जाणें ! ” “ खचित नाहीं ! ताई, तूं, तुझी आई, भाऊ, मनानें अत्यंत श्रीमंत आहांत ! आमची समजूत धनाच्या श्रीमंतीपेक्षां मनाची श्रीमंती श्रेष्ट आहे आणि तुम्हीं धनानें दरिद्री आहां - मनानें श्रीमंत आहां, म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम करतें - मैत्रिण समजतें ! तुझ्या माझ्या मैत्रिचीं कारण मला समजतात, ती एवढींच आहेत. आणखीही कांहीं असतील त मला कळत नाहींत ! " बबूताईच्या या अंतःकरणाच्या बोलानें माझ्या हृदयाला अमृताचा सेक केल्यासारखा वाटला ! ताईबद्दलची माझी समजूत-प्रीती- भक्ती- भावना - सद्बुद्धि एकदम दुणावली ! माझ्या नेत्रांत आनंदाश्रु उभे राहिले ! मी ताईचा हात माझ्या हातांत घेतला ! घट्ट धरला ! आणि म्हटलें, " बबूताई, एक दोन शब्दांनींच तूं माझी जगाविषयींची सम- जूत बदलून टाकलीस ! खरोखरच साऱ्याच जगानें कांहीं पापानें पाय धुतलेले नाहींत. हृदयाच्या श्रीमंतीचीं- खऱ्याखुऱ्या माणूसकीचीं- -